मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या सध्या दापोली मध्ये गेले आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचा साई रिसार्टवर प्रतिकात्मक हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोली गेले आहेत. अनिल परब यांचा साई रिसोर्ट लवकरच तुटणार आहे . असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यावर आता अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणुस ;” शिंदे गटाच्या आमदाराचं सुळेंकडून कौतुक
साई रिसॉर्टचा मालक मी नसून सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कादोपत्री सिद्ध केलेली आहे. महसुल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिशी आलेल्या आहेत. त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र जाणूनबुजून किरीट सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावत आहेत. सदानंद कदमी माझे मित्र आहेत. या रिसॉर्टच्या बाबतीच कोर्टाचे जैसे थे असे आदेश आहेत. या आदेशांतर्गत कोर्टोने या रिसॉर्टला संरक्षण दिलेले आहे. असंही अनिल परब यांनी सांगितले आहे.
“लाखो नोकऱ्या, महागाईचा भडका, यालाही विपर्यास म्हणणार का?”रोहित पवारांचं फडणवीसांना सवाल
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, मला त्रास देणे, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे, हाच किरीट सोमय्या यांचा उद्देश होता. ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्याबद्दल सोमय्या एकही शब्द बोलत नाहीत. सोमय्या यांनी माझ्यावर मुद्दामहून आरोप केले आहेत. नारायण राणे यांच्या घरावरही कारवाई केली आहे. तिकडे सोमय्या हातोडा घेऊन का जात नाहीत. असा सवाल देखील त्यांनी सोमय्यांना केला आहे.
आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावनिक पत्र…! म्हणाले, “तुमचे आशीर्वाद अन् प्रेम मला…”
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईत असलेल्या बंगल्यावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यांचा हा बंगला जुहू येथील भागात असून त्या बंगल्यावर अनधिकृत बांधकाम असल्याने ते पाडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Read also
- “मालक, निदान एक लाखाचा आकडा तरी पुर्ण करा”; राष्ट्रवादीने मोदींना डिवचलं
- “हा गरीब बिचारा मारला जाईल अन् वरचे अधिकारी..” आव्हाडांचं त्या प्रकरणावर भाष्य
- “तर त्यांनी स्वत; च्या बुद्धीबाबत विचार करावा;” भाजपच्या प्रवक्त्यानी उलट विरोधकांना सुनावलं
- “हे सरकार 100 टक्के पडतंय, माझ्याकडे पुर्ण माहिती अन् खात्री”; संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
- “राज्यपालांच्या वक्तव्याचा सगळ्याच नेत्यांकडून निषेध..! भाजप नेते कुठंय?”