मुंबई : आज शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरूद्ध भाजप यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसत आहेत. राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्याने आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावरचं दिल्लीचं आक्रमण आहे. परंतु महाराष्ट्र अशा कारवायांसमोर कधीही झूकणार नाही, थांबणार नाही. ज्यादिवसापासून याठिकाणा महापालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत. तशापासून हे सर्व सुरू आहे. सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रंणा झाल्या आहेत. अशी टीकाही त्यांनी भाजपवर यावेळी केली.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
शिवसेनेचे युवा कार्यकर्ते राहुल कनाल यांच्या घरी आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. मुंबईतील वांद्र येथील भाभा रूग्णालयाजवळील नाईन अलमेडा या घरावर छापा मारला. त्यावेळी त्यांच्या घरासमोर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर आयकर विभागाच्या धाडीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
शिवसेना खासदार संजय राऊत हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी या अगोदर देखील केंद्रीय तपास यंत्रणामधील 3 अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार संदर्भात कडक शब्दांत इशारा दिला होता. त्यामुळे आज होत असलेल्या पत्रकार परिषदमध्ये संजय राऊत कोणती माहिती समोर आणतात. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
- आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा