मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांनी पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात घेतली. शरद पवारांनी ज्याठिकाणी सभा घेतल्या त्याठिकाणी लगेच त्या सभेला प्रत्युत्तर सभा घेतल्या जातील असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. परंतु त्यावर अजित पवारांनी अद्याप सभा घेतली नाही. परंतु आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या सभांचा धडका सुरू होणार आहे.
हेही वाचा…“सभागृहात काय फक्त अंड उबवायला जातात का ?” तुपकरांचा गुलाबराव पाटलांना खोचक सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात शरद पवारांची पुढची सभा आयोजित करण्यात आली आहे. येवल्यानंतर बीडमध्ये शरद पवारांची येत्या १७ ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. या सभेची जबाबदारी संदीप क्षीरसागर यांना दिली आहे. आज झालेल्या बैठकीत या दौऱ्याबाबत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देण्याऱ्याला भाजपने कार्यकारिणीत घेतलं, सुप्रिया सुळेंचा संताप, थेट “फडणवीसांना…”
दरम्यान, इंडियाच्या होणाऱ्या बैठकीत किमान समान कार्यक्रमसाठी समिती बनवण्याची चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या समितीत प्रत्येक पक्षाचे पाच प्रतिनिधी त्या समितीत असणार आहे. लोकसभा निवडणुकीला इंडिया आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. तर मुंबईत ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देशातील सर्व विरोधक मुंबईत एकवटणार, महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“आर…दादा आम्ही शरद पवार साहेबांचा आदर करुच, परंतु..,” भाजपचा रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न”, वाचा सविस्तर
हेही वाचा…ठाकरेंच्या अजून एक मोहरक्यावर गुन्हा दाखल, शिंदेंनी काल इशारा दिला, अन् गुन्हा दाखल
मिशन विदर्भ..! अजित पवार गटाचे विदर्भात मेळावे, विदर्भात ताकद वाढवणार