नाशिक : भाजपकडून सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक मधील निखित भामरे याचंही नाव या यादीत आहे. यामध्ये 1 संयोजक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे 5 सह संयोजक आहेत, त्यामध्ये निखिल भामरेची वर्णी लागली आहे. मात्र निखील भामरे याची नियुक्ती राष्ट्रवादीला खटकली आहे.
हेही वाचा…शिरुर लोकसभा प्रमुख महेश लांडगे, समन्वयकपदी राजेश पांडे : ‘त्या’ चर्चेत तथ्य नाही!
या नियुक्तीवर राष्ट्रवादीने आक्षेप नोंदवला आहे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले असून भाजपवर टीका केली आहे. सोशल मिडियात मा. पवार साहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपकडून सोशल मिडियाचा सहसंयोजक म्हणून नेमणूक केली जाते, म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचं काम भाजपच करत असल्याचं स्पष्ट झालंय. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध! भाजपच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचंय..असं म्हणत रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला
दरम्यान, या टीकेला भाजपचे प्रवक्ते प्रवीण अलई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आर आर …दादा आम्ही मा शरद पवार साहेबांचा आदर करुच…परंतु…आपल्या पक्षातील पदाधिकारी यांनी काय आचरण केले बघा आधी. देशाच्या व राज्याच्या संवैधानिक पदावरिल महनीय व्यक्तिबाबत खालच्या स्तरावर भाष्य करणारे किती तरी सुकलेली गिधाडे होती, सत्ता काळात अनेक तक्रारी दाखल असताना, एक ही कारवाई करण्यात आली नाही? महिला भगिनीना त्रास देत, नेत्यांचे बनावट मैसेज व फोटो मॉर्फ करुण बदनामी चालविली त्यावेळी कुठे होतात? विकृति आणि स्वीकृती भाजपा ची नाहीच, आपल्या पक्षातिल अंर्तगत खतपाणी व फवारणी कशी व कुठे होते त्यावर लक्ष ठेवा. त्यामुळे शिल्लक कर्तुत्व आणि नेतृत्व आपण जपावे. बाकी राज्याचे उपमुख्यमंत्री सक्षम आहेत, असं अलई यांनी म्हटले आहे.
आर आर …दादा
आम्ही मा शरद पवार साहेबांचा आदर करुच…परंतु…
आपल्या पक्षातिल पदाधिकारी यांनी काय आचरण केले बघा आधी. देशाच्या व राज्याच्या संवैधानिक पदावरिल महनीय व्यक्तिबाबत खालच्या स्तरावर भाष्य करणारे किती तरी सुकलेली गिधाडे होती, सत्ता काळात अनेक तक्रारी दाखल असताना, एक ही… https://t.co/lx4zigJr8L— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) August 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न”, वाचा सविस्तर
हेही वाचा…ठाकरेंच्या अजून एक मोहरक्यावर गुन्हा दाखल, शिंदेंनी काल इशारा दिला, अन् गुन्हा दाखल
मिशन विदर्भ..! अजित पवार गटाचे विदर्भात मेळावे, विदर्भात ताकद वाढवणार
हेही वाचा…“सभागृहात काय फक्त अंड उबवायला जातात का ?” तुपकरांचा गुलाबराव पाटलांना खोचक सवाल
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देण्याऱ्याला भाजपने कार्यकारिणीत घेतलं, सुप्रिया सुळेंचा संताप, थेट “फडणवीसांना…”