नवी दिल्ली : आगामी काही महिन्यात देशात विविध राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रचार प्रसार करण्यासाठी निवडणुकांसाठी राजकीय सभांचा धडका लावला आहे. तर भाजप प्रमाणे काॅंग्रेसने देखील मोठी कंबर कसली आहे. यातच आता तेलंगणात काॅंग्रेसने आपला जाहीरनामा जाहिर केला आहे.
हेही वाचा…मराठवाडा वॉटरग्रिडचा मुद्दा गाजला, फडणवीसांची ठाकरेंवर टिका, आता दानवेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
केंद्रात मोदींची सत्ता असतांनाही कर्नाटकात काॅंग्रेसने भाजपला धोबीपछाड दिला होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीच्या वेळी काॅंग्रेसने ५ गॅरंटी आश्वासने दिली होती. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश आलं होतं. यातच आता तेलंगणा राज्यात विधानसभेच्या निवडणुकीतही काॅंग्रेसने ही ६ आश्वासने लोकांना दिली आहेत.
हेही वाचा…“पाठपुरावा करा, मंत्रीपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही”, अजित पवारांनी मंत्र्यांनाच दिला दम
दरम्यान, काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यात इंदिराम्मा इंदलू योजने अंतर्गत प्रत्येकांना घर बनवण्यासाठी ५ लाखांची मदत केली जाणार आहे. तर यामध्ये तेलंगणा आंदोलनकर्त्यांना प्रत्येकी २५० स्कायर यार्ड जमीन दिली जाणार आहे. महालक्ष्मी योजनांतर्गत महिलांना २५०० रूपये प्रतिमहिना तसेच मोफत बस प्रवास, त्याचबरोबर सिंलेडर फक्त ५०० रूपयात देण्यात येणार आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री आले आणि गेले, ‘कोट्यावधी रूपयांचा झाला’ चुराडा, कॅबिनेट बैठक चर्चेत
गृहज्योती योजनेंतर्गत २०० युनिट वीज माफ. युवा विकासम अतंर्गत काॅंलेजमधील विद्यार्थ्यांसाठी ५ लाखांची आर्थिक मदत. तसेच चेयुथा अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना, विधवांना, विकलांग नागरिकांना ४००० रूपयांची पेन्शन योजना. यामध्ये राजीव आरोग्यश्री योजना द्वारे १० लाख पर्यंत आरोग्य वीमा. रयथू भरोसा अतंर्गत शेतकऱ्यांसाठी १५,००० आणि मजदुरांसाठी १२,००० प्रति एकर रूपये देण्यात येणार आहे. तेलंगणा राज्यात काॅंग्रेसची सत्ता आली तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हे सर्व निर्णय घेतले जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
तेलंगाना को कांग्रेस की ये 6 गारंटी हैं:
✅ इंदिराम्मा इंदलू
– घर बनाने के लिए ₹5 लाख सहायता
– तेलंगाना आंदोलन सेनानियों को 250 स्क्वायर यार्ड ज़मीन✅ महालक्ष्मी
– महिलाओं को ₹2,500 प्रतिमाह, मुफ़्त बस यात्रा
– गैस सिलेंडर सिर्फ़ ₹500 का✅ गृह ज्योति
– 200 यूनिट मुफ़्त… pic.twitter.com/adNaeWYXlB— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“रडायला भरपूर वेळ आहे, पण..,” अधिवेशनाच्या पूर्वीच मोदींचा विरोधकांना खोचक टोला
हेही वाचा…फडणवीस पेक्षा ठाकरे वरचढ..! फडणवीसांच्या ५ वर्षापेक्षा फक्त अडीच वर्षात ठाकरेंची कामगिरी दमदार
हेही वाचा…सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर ह’ल्ला, गाडीच्या काचाही फोडल्या, वाघमारे गंभीर जखमी
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणावरही अन्याय होणार नाही”, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली ग्वाही
हेही वाचा…दुष्काळी मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी…