मुंबई : भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल कऱण्याची सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी सवाल केला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, गिरीश महाजन यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. तसेच मागील काळात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता असं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यावर आता काॅंग्रेसने फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
गुजरात मॉडेल अभ्यासासाठी राज्यातील मंत्री गुजरातमध्ये..! राष्ट्रवादीची टिका
मागील विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे भक्कम दावेदार असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातून बाहेर ढकललं असा आरोप केला जात आहे. तसेच आता हे भाजपचे नेत्यांचा सरकारमध्ये देखील समावेश नाही. त्यांच्याकडे पक्षाच्या पदाव्यतिरिक्त कोणत्याही विधिमंडळाचं सदस्यत्व नाही. आता काॅंग्रेसने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय लढाई सुरू असताना मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज निर्णय; वाचा संपुर्ण यादी
सीबीआयने गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या चर्चेवर काॅंग्रेसने खोचक टिप्पणी केली आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंनंतर आता फडणवीस महाजनांचाही राजकीय काटा काढणार वाटतं. असं काॅंग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार त्या पाहणं महत्वाचं ठरणार आहेत. अशातच काल पंकजा मुंडे यांनी देखील मोदींवर बाबत खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे.
रात्री 12 पर्यंत मनसोक्त गरबा नाचा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान, सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राईव्ह दिला होता. त्या पेन ड्राईव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा खुलासा केला होता. तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आलं होतं. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंनंतर आता फडणवीस महाजनांचाही राजकीय काटा काढणार वाटतं! pic.twitter.com/icbdVAmJxN
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 28, 2022
Read also
- “माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
- “मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ
- “त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
- “कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख
- “देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार”; एकनाथ शिंदे