पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वंशवाद संपवण्याचं ठरवलं आहे. पंरतु मोदींनी जरी ठरवलं तरी मला ते संपवू शकत नाही. असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रात्री 12 पर्यंत मनसोक्त गरबा नाचा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
राज्यात आता ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका सुरू होत आहेत. आता या निवडणुका आपण वेगळ्या पद्धतीनं लढुया. आपल्याला जातपात, पैसा, प्रभाव याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे. मात्र मला कोणी संपवू शकत नाही. मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करू शकणार नाहीत असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.
कोर्टात लढाई सुरू असताना काॅंग्रेस, भाजपच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंचं बळ वाढलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा करणे, हेदेखील अयोग्य आहे. पंकजा मुंडे या मोदी यांना आव्हान देऊ शकत नाहीत. मला वाटतं. पंकजा मुंडे यांच्या विधानाचा तसा अर्थही काढला जाऊ नये, त्या पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पण मी जनतेच्या मनात असेन तर मी वंशवादाच्या व्याखेत बसणार नाही, असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडे यांची पाठराखण केली आहे.
मोठा ट्विस्ट..! उद्धव ठाकरेचं 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष, कोर्टात कागदपत्र सादर
दरम्यान, महाराष्ट्र भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्या लोकप्रियतेची बरोबरी करणारे नेतृत्व आहे. हे सत्य नेमके कुणाला रूचत नाही. ? माझ्या व त्यांचे पक्ष, विचार वेगळे आहेत पण कट, कारस्थानावेळी महिला म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. असं मत राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also
- “त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
- “कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख
- “देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार”; एकनाथ शिंदे
- गुजरात मॉडेल अभ्यासासाठी राज्यातील मंत्री गुजरातमध्ये..! राष्ट्रवादीची टिका
- राजकीय लढाई सुरू असताना मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज निर्णय; वाचा संपुर्ण यादी