कराड: सातारा, सांगली जिल्हांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासून कृष्णाकाठावर रणधुमाळी सुरु होती. महिन्याभराच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनलमधील दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य मतदानातून ठरणार होते . कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी तब्ब्ल ९१ टक्के मतदान झाले होते. चुरशीच्या झालेल्या लक्षवेधी प्रचार यंत्रणांनंतर मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढलेली होती आणि आता जवळपास सर्वच जागांचे निकाल हाती लागले आहेत.
हे पण वाचा, सहकार पॅनलची विजयाकडे घौडदोड; कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारात जेसीबीने गुलाल उधळण्यास सुरुवात
सांगली सातारा जिल्ह्यांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यात पुन्हा एकदा सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा सभासदांनी विश्वास दाखवलेला आहे. सर्वच्या सर्वच जागांवर जयवंतराव भोसले सहकार पॅनलला यश मिळाले आहे. मिळालेल्या यशानंतर डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांना संबोधीत केले आहे
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुक मतमोजणीत सहकार पॅनलला विक्रमी आघाडी; दोन जागांवर विजयी सलामी
यावेळेसची निवडणूक ही फक्त वैयक्तिक टीका-टिप्पणींवर आम्ही लढवली नव्हती तर मागच्या पाच वर्षांमध्ये जे काही पारदर्शक कार्य सभासदांसाठी केले त्याचा मुद्देसूद लेखाजोखा आम्ही सभासदांसमोर अत्यंत प्रखरपणे मांडला आणि सभासदांनी देखील आम्हाला साथ दिली. मोठ्या प्रमाणावर मताधिक्य वाढलेले आहे आणि यामुळे आमची जबाबदारी देखील वाढलेली आहे. आम्ही सभासदांना पुढील येणाऱ्या काळात योग्य भाव देण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच कारखानदारीचे क्षेत्र अगदी योग्यरीत्या चालवू असे डॉ. सुरेश भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा,
विरोधकांनी गेल्या ६ वर्षात सभागृहात तोंड का उघडले नाही? डॉ. सुरेश भोसले यांचे टीकास्त्र
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
जयवंतराव भोसले पॅनलची अंतिम विजयाकडे घौडदौड सुरु; पहिल्या पाचही जागांवर निर्विवाद वर्चस्व