मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ईडीने नोटीस बजावल्यानंतर पीएमसी बँक घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ईडीने नोटीस बजावल्यानंतर वर्षा राऊत या काल चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. आता कथित घोटाळ्यात आणखी एक शिवसेनेचा नेता अडकण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांच्यापाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. याबाबत ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे.
#संजयराऊत नंतर #शिवसेने चा आणखी एक नेता पीएमसी बँक घोटाळा चा लाभार्थी !! चौकशी व्हायलाच हवी @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/tXfyTnVV72
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 5, 2021
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील देखील ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेनेचा खासदार राहिलेला नेता देखील यात असून, त्यांच्या कुटुंबाची देखील चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
दरम्यान, ईडीच्या नोटीसनंतर वर्षा राऊत चौकशीसाठी काल हजर झाल्या होत्या. ईडीकडून त्यांची जवळपास 4 तास चौकशी करण्यात आली. वीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.
Read Also :
- यंदा प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करा, भाजप नेत्याची मोदींकडे मागणी
- … अन् शेतकऱ्यांनी भाजप नेत्याच्या घरासमोर टाकले शेण
- नव्या कोरोना व्हायरसचे थैमान, ‘या’ देशाने पुन्हा केली लॉकडाऊनची घोषणा
- उद्या कदाचित मलाही ईडीची नोटीस येऊ शकते – रोहित पवार
- ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सेनेचे गुजराती कार्ड
- महाराष्ट्रात आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी
- शेतकरी – सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ, 8 जानेवारीला पुढची बैठक