पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे पुण्यातील लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोन्हीही आमदार चांगलेच चर्चेत आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचा निकाल त्यांनाच समर्पित केला होता. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील या दोन्ही नेत्यांची नावे चर्चेत येण्याची शक्यता आहे.
“आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक गेल्या काही दिवसापासून आजारी आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी त्यांना रूग्णावाहिकेतून विधिमंडळात मतदानासाठी आणण्यात आलं होतं. त्यांना घेण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आले होते. भाजपचा या निवडणुकीत विजय झाल्यानंतर पत्रकार परिषदेत यांनी दोन्ही नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी आर्वजून उल्लेख केला होता.
आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी लक्ष्मण जगतप हे त्यांच्या निवासस्थानातून सकाळी 7 वाजता विधिमंडळात जाणार आहेत. तर आमदार मुक्ता टिळक या केसरीवाड्यातून सकाळी साडे सहावाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत. दुर्धर आजाराशी सामाना करणारे हे दोन्ही नेते मतदानासाठी मुंबईत दाखल होत असल्याने दोन्ही नेत्यांचं सध्या जोरदार कौतुक केलं जात आहे.
“महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांना उद्याच्या निवडणुकीसाठी आला नाहीत तरी चालेल, असं लक्ष्मण जगताप यांना सांगण्यात आलं. पहिले राष्ट्र त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वत: असं म्हणत लक्ष्मण जगताप मतदानासाठी तयार झालेत. अशी माहिती भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली आहे. त्यामुळे विधानपरिषदेचा गड सर करायला भाजपाचे दोन्ही शुर आमदार सज्ज झाले आहेत. असंही त्यांनी सांगितलेय.
“घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
दरम्यान, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार उभे राहिले आहेत. यामध्ये भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर आणि शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमाश्या पाडवी तर काॅंग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read also:
- “पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, उद्याची निवडणूक आपणच जिंकणार”; उद्धव ठाकरे
- “देवेंद्र पेक्षा हितेंद्र पावरफुल ठरणार, कोणी कितीही लोटांगण घाला”
- “उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, तर शरद पवार दिल्लीकडे रवाना”; राजकीय घडामोडींना वेग
- सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब
- “निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत