मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील आठ मत फुटल्याने भाजपचे नेते धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर शिवसेनेचे नेते संजय पवार यांना पराभावाचा सामाना करावा लागला. हा पराभव शिवसेनेच्या पचनी पडला नाही. त्यानंतर शिवसेनेने याचा खापर अपक्ष आमदारांवर फोडला. त्यानंतर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचंही यावेळी कौतुक केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.
“महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात
राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांची मोलाची भुमिका राहिली आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडीतील आठ मत वळवण्यात देवेंद्र फडणवीस यांना देखील यश मिळालं. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची राहणार आहे. यामध्ये बहूजन विकास आघाडीकडे तीन आमदार असल्याने त्यांचं महत्व सध्या खुप आहे.
“घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकुर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता त्यांची भेट भाजपसह महाविकास आघाडीतील काही राजकीय नेते देखील घेत आहेत. त्यावरून विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र पेक्षा हितेंद्र पावरफुल ठरणार, कितीही लोटांगण घाला. असा टोला अमोल मिटकरी यांनी भाजपला लगावला आहे.
“शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”
दरम्यान, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार उभे राहिले आहेत. यामध्ये भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर आणि शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमाश्या पाडवी तर काॅंग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read also:
- “उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, तर शरद पवार दिल्लीकडे रवाना”; राजकीय घडामोडींना वेग
- सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब
- “निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत
- “आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा
- आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा