पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. तर यातच काल देशात सत्ताधारी आणि विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवार बंगळुरू येथे विरोधकांच्या बैठकीला तर दिल्लीत अजित पवार सत्ताधारी पक्षांच्या बैठकीला उपस्थित होते. यातच आता अजित पवारांचे दोन पुत्र देखील राजकारणात सक्रीय झाले आहेत.
हेही वाचा…आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक, सभागृह नेता, भाजपच्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी धीरज घाटेंवर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आणि मात्र वडील उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पार्थ पवार आणि अजित पवार यांचे दुसरे सुपुत्र जय पवार हे आता सक्रिय झालेले पहायला मिळत आहेत. बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जय पवार देखील त्यांच्यासोबत पहायला मिळाले. त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे.
हेही वाचा…भाजपमध्ये मोठे खांदेपालट, धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष तर शंकर जगतापांकडे पिंपरी चिंचवडची जबाबदारी
दरम्यान, गेल्या ९ वर्षात भाजपला एनडीएची आठवण झाली नव्हती. परंतु आम्ही पाटणा आणि बंगळुरूला जमलो, तेव्हा मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. आम्ही एकत्र जमलेलो पाहून त्यांना भीती वाटते आहे. विरोधकांच्या आघाडीला भ्रष्टाचारी म्हणता, मग काल तुमच्याशेजारी तर ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा उभा होता. अशी टिका खासदार संजय राऊतांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर त्याला ‘संतोष बांगर अन् मुख्यमंत्री’ जबाबदार,” अयोध्या पौळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी
हेही वाचा…अजित पवारांची बंद दाराआड चर्चा, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले, “राज्यात आता…”
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची विधानसभेत एंट्री, सोमय्यांवर प्रश्न विचारले असता, म्हणाले की, “अशा…,”
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले