पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून संघटनात्मक बदल करण्यात येत आहे. भाजपसाठी महत्त्वाचे मानले जाणाऱ्या पुणे शहराच्या अध्यक्षपदी माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आहे. तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा…” ही सेक्स खंडणी आहे का ? व्हिडीओच्या त्या बाजूला कोण होतं? सगळ्याची चौकशी करा,” अनिल परबांची मागणी
बावनकुळे यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्यभरातील नवीन जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. आगामी पुणे महापालिका तसेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धीरज घाटे यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. घाटे यांची ओळख कट्टर हिंदुत्वावादी कार्यकर्ता म्हणून पुणे शहरात आहे. महापालिका नगरसेवक तसेच सभागृह नेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे.
हेही वाचा…मोदींच्या विरोधात विरोधक एकजुटले, आघाडीचं नाव ठरलं, विरोधकांनी दिलं ‘हे’ नाव
पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती झालेलं शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आहेत. जगताप यांचे शहरामध्ये चांगला जनसंपर्क असून आगामी निवडणुकांत त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
हेही वाचा…सोमय्यांचा विषय सभागृहात गाजला, ठाकरेंच्या वाघांनी थेट हल्लाच केला, दानवेंनी थेट पेन ड्राईव्ह दिला
राज्यातील पोटनिवडणूक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये भाजपाची मोठी पिछेहाट सुरू असताना चिंचवडमध्ये केवळ ‘जगताप पॅटर्न’मुळेच पक्षाची पत राहिली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी अचूक नियोजन करीत महाविकास आघाडीचे तगडे आव्हान रोखले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय सोपा झाला. त्यामुळे शंकर जगताप भाजपासाठी ‘संकटमोचक’ ठरले होते. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…दिल्लीत दिसली महाराष्ट्राची ताकद, एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना विशेष स्थान
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको! ‘पेटा’च्या भूमिकेनंतर आमदार महेश लांडगे ‘ॲक्टिव्ह’
हेही वाचा…मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरच्या एक सहीत अडकला, वांद्रे पश्चिम रेक्लमेशनमधील विकास, भाजपच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा…कधीकाळी मोदींना टक्कर देणारा नेता, विरोधकांनीही पत्करली होती शरणागती; मग एक सीडी आली आणि खेळ संपला
हेही वाचा…काल आमदारांची भेट..! आज शरद पवारांनी तब्बल २१ नेत्यांना दाखवला घरचा रस्ता