विरेश आंधळकर, प्रतिनिधी..! किरीट सोमय्या हे नाव माहित नसलेली एकही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही. भाजपचे माजी खासदार असणारे सोमय्या हे विरोधी नेत्यांचे घोटाळे काढण्यात तरबेज असणारे नेते. मात्र सध्या त्यांचे काही कथित व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. नग्नावस्थेत असणारे हे व्हिडीओ पुढे आल्यानंतर त्यांच्यासह भाजपची मोठी कोंडी झालीय. तर विरोधकांमध्ये मात्र कमालीचे आनंदाचे वातावरण आहे. एखाद्या नेत्याचे असे खळबळ उडवून देणारे व्हिडीओ बाहेर येणे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही.
हेही वाचा…“हवं तर यांना मंत्री करा, बच्चू कडूंनी मंत्रिपदाचा दावा सोडला”, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर जाहीर केली भूमिका
काही वर्षांपूर्वी भाजपचे जेष्ठ नेते संजय जोशी यांची देखील कथित सीडी बाहेर आली. ज्यामुळे भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कट्टर विरोधी चेहरा असणारे संजय जोशी यांचे राजकीय जीवन उध्वस्त झाले. राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद मोदी यांचा सामना करू शकेल, असा एकही चेहरा आज भाजपमध्ये नाही. परंतु एक वेळ अशी होती कि भाजपमध्ये एक नेता असा होता, जो मोदींचा मोठा प्रतिस्पर्धी होता. १९८८ साली गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उदयासाठी आरएसएसने दोन स्वयंसेवकांना राजकारणात उतरवले. एक होते प्रभारी संजय जोशी आणि दुसरे सरचिटणीस नरेंद्र मोदी. दोघांनी मिळून गुजरातमध्ये संघटना मजबूत केली. त्यामुळे 1995 मध्ये गुजरातमध्ये पहिल्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाले.
हेही वाचा…“राज्याचं विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसच्या तरूणाकडे द्या,” राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी
भाजप सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि पक्षाचे दुसरे नेते शंकरसिंह वाघेला यांच्यात वाद झाले. त्यामुळे पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले. पुढे वाघेला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तसेच केशुभाई पटेल यांना देखील मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले. 1998 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दुसऱ्यांदा विजय मिळवला. केशुभाई पटेल पुन्हा मुख्यमंत्री झाले. केशुभाईंनी या विजयाचे श्रेय संजय जोशी यांना दिले. त्यामुळे संजय जोशी यांच्या राजकीय कौशल्याची आणि संघटना बांधणीची प्रशंसा होऊ लागली. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांच्यातील अंतर वाढले.
हेही वाचा…“किरीट सोमय्या, नागडा तर तु झाला आहेस, सभागृहात पेन ड्राईव्ह देणार,” ‘या’ नेत्याना दिला इशारा
गुजरातमध्ये निवडणूक जिंकल्यानंतरही भाजपच्या हायकमांडने मोदींची गुजरातमधून उचलबांगडी केली. मोदींना दिल्लीतील भाजप मुख्यालयात पाठवले गेले. गुजरातमध्ये केशुभाई पटेल आणि संजय जोशी या जोडीने यशस्वी घौडदौड सुरु केली. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर संघाचा पाठिंबा असलेले संजय जोशी राष्ट्रीय राजकारणात उदयास येऊ लागले. परंतु दिल्लीत असणारे नरेंद्र मोदी मात्र अजिबात खुश नव्हते असं बोललं जात.
2005 मध्ये, जेव्हा शिवराज सिंह चौहान पहिल्यांदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात संजय जोशी यांची सर्वात मोठी भूमिका होती. त्यावेळी जोशी एमपी भाजपचे संघटन महामंत्री होते. त्यांनी चौहान यांना विरोध करणाऱ्या उमा भारती यांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतून धक्के देत बाहेर काढले होते. पंरतु तेंव्हाच जोशींचा राजकीय जीवनामध्ये वादळ निर्माण झालं.
2005 साली भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन होणार होत, यामध्ये एक मोठी घोषणा करण्यात येणार होती. पंरतु त्याआधीच भाजपमध्ये वेगाने यश मिळवणारे नेते संजय जोशी यांच्या एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली. एक कथित सेक्स सीडी आणि ऑडिओ टेप बाहेर आली. देशात २४ तास बातम्या देणारे चॅनेल्स आणि दर तासाला बातम्या देणाऱ्या रेडिओ वाहिन्यांचे युग तेव्हा सुरु झाले होते. बातमी पसरली. भारतीय राजकारणाच्या इतिहासात यापूर्वी, देशाने कोणत्याही सेक्स सीडी किंवा सेक्स स्कँडलचे असे लाइव्ह प्रक्षेपण पाहिले नव्हते.
सीडीमध्ये संजय जोशीसारखा माणूस एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होते. ही सीडी मध्य प्रदेशातूनच प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे ही महिला मध्य प्रदेशातील असल्याचे बोलले गेले. मात्र या महिलेची ओळख शेवटपर्यंत पुढे येऊ शकली नाही. पोलिसांनी केलेल्या तपासात सीडीमध्ये दिसणाऱ्या पुरुषाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी पुराव्याअभावी फाईल बंद केली. तसेच संजय जोशी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात आला. मात्र संजय जोशी यांना पक्षातील सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागला. त्यांचे संपूर्ण राजकीय जीवन उध्वस्त झाले.
READ ALSO :
हेही वाचा…काल आमदारांची भेट..! आज शरद पवारांनी तब्बल २१ नेत्यांना दाखवला घरचा रस्ता
हेही वाचा…” ही सेक्स खंडणी आहे का ? व्हिडीओच्या त्या बाजूला कोण होतं? सगळ्याची चौकशी करा,” अनिल परबांची मागणी
हेही वाचा…मोदींच्या विरोधात विरोधक एकजुटले, आघाडीचं नाव ठरलं, विरोधकांनी दिलं ‘हे’ नाव
हेही वाचा…सोमय्यांचा विषय सभागृहात गाजला, ठाकरेंच्या वाघांनी थेट हल्लाच केला, दानवेंनी थेट पेन ड्राईव्ह दिला
हेही वाचा…“सोमयांचा व्हिडीओ आत्ताच का यावा ? भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिला”