नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सत्ताधारी आणि विरोधकांनी बैठकांमधून आज शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. बंगळुरुत विरोधी पक्षाची बैठक पार पडली तर दिल्लीत एनडीए ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. विशेष म्हणजे नव्याने सामील झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विशेष स्थान देण्यात आलं. त्यामुळे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं अभिमानाने म्हणण्याची वेळ आली आहे. आज महाराष्ट्राच्या दोन्ही नेत्यांना विशेष स्थान दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली.
हेही वाचा…मोदींच्या विरोधात विरोधक एकजुटले, आघाडीचं नाव ठरलं, विरोधकांनी दिलं ‘हे’ नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आए एनडीए ची बैठक झाली. या बैठकीसाठी देशातील जवळपास ३८ पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. बैठकीच्या वेळी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या मधोमध एकनाथ शिंदे यांची बैठकीची व्यवस्था करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला अमित शहा यांच्या बाजूलाच अजित पवारांनाही स्थान देण्यात आले. विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी असलेल्या पहिल्याच रांगेत दोघांना स्थान देण्यात आल्याने याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा…सोमय्यांचा विषय सभागृहात गाजला, ठाकरेंच्या वाघांनी थेट हल्लाच केला, दानवेंनी थेट पेन ड्राईव्ह दिला
दरम्यान, आज बंगळुरू येथे विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत आघाडीच नाव इंडीया म्हणून देण्यात आले. तर या बैठकीसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको! ‘पेटा’च्या भूमिकेनंतर आमदार महेश लांडगे ‘ॲक्टिव्ह’
हेही वाचा…मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरच्या एक सहीत अडकला, वांद्रे पश्चिम रेक्लमेशनमधील विकास, भाजपच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा…कधीकाळी मोदींना टक्कर देणारा नेता, विरोधकांनीही पत्करली होती शरणागती; मग एक सीडी आली आणि खेळ संपला
हेही वाचा…काल आमदारांची भेट..! आज शरद पवारांनी तब्बल २१ नेत्यांना दाखवला घरचा रस्ता
हेही वाचा…” ही सेक्स खंडणी आहे का ? व्हिडीओच्या त्या बाजूला कोण होतं? सगळ्याची चौकशी करा,” अनिल परबांची मागणी