मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातच काल विधान परिषदेत आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी मुद्दा उचलून धरला. तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. आता याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच यावर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता. त्यांनी यावर संताप व्यक्त केला.
हेही वाचा…कधीकाळी मोदींना टक्कर देणारा नेता, विरोधकांनीही पत्करली होती शरणागती; मग एक सीडी आली आणि खेळ संपला
कोण आहे किरीट सोमय्या? कोणाचंही नाव घ्यायचं आणि तुमचा टीआरपी वाढवायचा, असं सगळं सुरू आहे. रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे हवे तितके फोटो काढा आणि दाखवा, तुमच्या टीव्हीवर, टीआरपीसाठी, असं म्हणत प्रकाश आंबडेकर यांनी या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केल आहे.
हेही वाचा…काल आमदारांची भेट..! आज शरद पवारांनी तब्बल २१ नेत्यांना दाखवला घरचा रस्ता
दरम्यान, किरीट सोमय्यांची ही कथित क्लिप काल लोकशाही न्युजने प्रसारित केली आहे. त्यानंतर लोकशाही न्यूज दोन तासासाठी बंद करण्यात आले. त्यावर लोकशाही चॅनल दोन तासांपासून बंद आहे. सत्तेचा खेळ किती क्रुर असू शकतो? लोकशाहीचा चौथा खांब म्हणून प्रसारमाध्यमांनी सत्य दाखवायचं ठरवल्यावर कसा आवाज दाबला जातो त्याचं हे मुर्तिमंद उदाहरण असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक, सभागृह नेता, भाजपच्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी धीरज घाटेंवर
हेही वाचा…भाजपमध्ये मोठे खांदेपालट, धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष तर शंकर जगतापांकडे पिंपरी चिंचवडची जबाबदारी
हेही वाचा…दिल्लीत दिसली महाराष्ट्राची ताकद, एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना विशेष स्थान
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको! ‘पेटा’च्या भूमिकेनंतर आमदार महेश लांडगे ‘ॲक्टिव्ह’
हेही वाचा…मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरच्या एक सहीत अडकला, वांद्रे पश्चिम रेक्लमेशनमधील विकास, भाजपच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर