पुणे : भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका जाहीर केल्या आहेत. पुणे शहराच्या शहराध्यक्ष पदावरून जगदीश मुळीक यांची उचलबांगडी करत आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक धीरज घाटे यांच्या खांद्यावर आता शहर भाजपची जबाबदारी सोपवली आहे.
हेही वाचा…काल आमदारांची भेट..! आज शरद पवारांनी तब्बल २१ नेत्यांना दाखवला घरचा रस्ता
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धीरज घाटे हे इच्छुक उमेदवार होते मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. घाटे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेत घाटेंची समजूत काढली होती.
हेही वाचा…” ही सेक्स खंडणी आहे का ? व्हिडीओच्या त्या बाजूला कोण होतं? सगळ्याची चौकशी करा,” अनिल परबांची मागणी
बावनकुळे यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्यभरातील नवीन जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. आगामी पुणे महापालिका तसेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धीरज घाटे यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. घाटे यांची ओळख कट्टर हिंदुत्वावादी कार्यकर्ता म्हणून पुणे शहरात आहे. महापालिका नगरसेवक तसेच सभागृह नेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपमध्ये मोठे खांदेपालट, धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष तर शंकर जगतापांकडे पिंपरी चिंचवडची जबाबदारी
हेही वाचा…दिल्लीत दिसली महाराष्ट्राची ताकद, एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना विशेष स्थान
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको! ‘पेटा’च्या भूमिकेनंतर आमदार महेश लांडगे ‘ॲक्टिव्ह’
हेही वाचा…मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरच्या एक सहीत अडकला, वांद्रे पश्चिम रेक्लमेशनमधील विकास, भाजपच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा…कधीकाळी मोदींना टक्कर देणारा नेता, विरोधकांनीही पत्करली होती शरणागती; मग एक सीडी आली आणि खेळ संपला