पुणे : मंत्रिमंडळाच्या बातम्या विविध ठिकाणी चालल्या आहेत. परंतु जर उद्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम राहिला असता. तर त्यासंदर्भात आम्हाला निमंत्रण दिलं असतं. मागील वेळी ज्या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला होता. त्यावेळी देखील आम्हाला निमंत्रण आलं होतं. तसं काही अजून आलेलं नाही, असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा कार्यक्रम होणार की नाही. याबाबत अद्यापही ठोस माहिती समोर आली नाही. आहे.
“भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
तसेच मंत्रिमंडळ लवकरात लवकर करणार असल्याचं ते उत्तरे येत होते. परंतु त्यांनी दिल्लीतील काही नेत्यांची भेटी घेतल्या आहेत. तसेच नंदनवन याठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झालीत. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. परंतु यामध्ये अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच पावसाळी अधिवेशनबाबत देखील बैठक पार पडली असेल. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
“हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
विधानसभेमध्ये सर्वात जास्त संख्याबळ असल्याने विरोधी पक्षनेता पद हे राष्ट्रवादीकडे आलं आहे. तसेच विधान परिषदमध्ये राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडे प्रत्येकी 10 तर शिवसेनेकडे 12 आमदाराचं संख्यबळ आहे. या अगोदर एका वेळी काॅंग्रेसकडे 41, राष्ट्रवादीकडे 42 होते. तसेच राष्ट्रवादीला अजून दोन आमदारांनी पाठिंबा दिला होता. परंतु ज्या पक्षाकडे सर्वात जास्त आमदार आहेत.. त्यावेळी काॅंग्रेसकडून राधाकृष्ण विखे पाटलांना विरोधी पक्षनेता पद देण्यात आलं होतं. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
दरम्यान, विधान परिषदेमध्ये सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे सरकारमध्ये जे काही आहेत. त्यांचं देखील मत समजलं नाही. त्यामुळे आमची उद्या बैठक बोलवली आहे. तसेच टीईटी परिक्षा घोटाळ्यात बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचं नाव घेतलं जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली पाहिजे. तसेच या प्रकरणात आम्ही विधिमंडळात देखील जाब विचारणार आहोत.
Read also
- आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला
- मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?
- “अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
- मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज