मुंबई : देशात एव्हाना राज्यात ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुका खोळंबल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता संपुर्ण देशात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. अशातच मध्यप्रदेश मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महिला निवडून आल्या. मात्र त्याठिकाणी सगळ्याच महिला उमेदवारांच्या पतीने शपथ घेतल्याने अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
“राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”
मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महिला राखीव असलेल्या जागांवर ज्या महिला निवडून आल्या. त्यांनी पदाची शपथ घेण्याऐवजी त्यांचे पती, पिता, दिर यांनी शपथ घेतली आहे. लोकशाहीची थट्टा करणारी ही घटना भाजपशासित मध्ये प्रदेशमध्ये घडली आहे. पंचायत नावाची एक वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत एक महिला सरपंच आहे. पण पंचायतीचे काम माक्ष तिचा पती करतो. लोक त्यालाच प्रधान म्हणतात. प्रधान देखील बॅनरवर स्व:ला प्रधानपती हे बिरूद्ध लावून अभिमानाने मिरवतो, हे असे प्रधानपती आता जागोजागी दिसायला लागले आहेत.
“हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला प्रधानसेवक म्हणवून घेतात. आता तेच या प्रधानपतींना आवर घालून लोकशाहीची थट्टा थांबवतील का? भाजपशासित राज्यात लोकशाहीची मूल्ये सर्रास पायदळी तुडवली जात आहेत, असे प्रकार थांबतील का? असा सवाल राष्ट्रवादीने भाजपला केला आहे.
“अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”
शरद पवार यांनी देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला धोरण राबवून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरुवातीला ३३ टक्के आरक्षण मिळवून दिले. त्यानंतर देशानेही या धोरणाचा स्वीकार केला. पुढे हे आरक्षण वाढून ५० टक्के झाले. महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देणारे धोरण दिले आहे. मात्र भाजपची सत्ता जसजशी राज्यांमध्ये आणि केंद्रात आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली. असं म्हणत राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.
Read also
- “हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
- महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
- “आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला
- “एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
- “चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल