मुंबई : नवी दिल्ली येथे रविवारी झालेल्या नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत उभं करण्यात आलं. या बैठकीमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावरून राष्ट्रवादीने आमदार रोहित पवार यांनी देखील त्यावर खोचक टिप्पणी केली. मात्र त्यानंतर त्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
“आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नीति आयोगाचे अधिकारी तसेच सोबत विविध राज्यातील मुख्यमंत्री देखील दिसत आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत उभे केल्याने त्यांच्यावर आता सगळीकडून टिका केली जात आहे. एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात. असं त्यांनी म्हटलं होतं.
“एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
परवडणाऱ्या शेतीसाठी यापुढील काळात फलोत्पादनाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. ही बाब डोळ्यासमोर ठेवून फलोत्पादनाला चालना देण्यासाठी आखण्यात आलेल्या ‘एकात्मिक फलोत्पादन विकास मिशन’ (MIDH) अंतर्गत ७ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या नियमात कालानुसार योग्य ते बदल करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत हा महत्त्वाचा मुद्दा मांडला. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
तसंच आयात कमी करुन निर्यात वाढीसाठी प्रयत्न करा, हा महत्त्वाचा मुद्दाही या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला. निर्यातीमध्ये महाराष्ट्राची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिलीय. याला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनेही महाराष्ट्राला मदत करावी. दरम्यान, GST लागू झाल्यानंतर अनेक राज्यांची आर्थिक गाडी अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळं GST भरपाईचा कालावधी वाढवणं, थकीत GST ची भरपाई, NDRF मदतीचे निकष बदलणं या अनेक राज्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरही केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Read also
- मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
- “हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
- महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक