दिल्ली : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 15 ऑगस्टपुर्वी होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांकडून वारंवार शिंदे सरकारवर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून टीका केली जात आहे. मंत्रिमंडळाचे कश्या प्रकारे वाटप होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. यातच आता महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मित्रपक्षांना वाटा मिळायला हवे. रासपला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक महामंडळ मिळावं, अशी मागणी राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी केली आहे.
“एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्याला एक महिना पुर्ण झाला आहे, तरी देखील अजुन मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसल्याने विरोधीपक्षाकडून सरकारवर जोरदार टिका केली जात आहे. शिवसेनेतून 40 आमदारांच्या सोबतच अपक्ष 10 आमदारांनी शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे पाठिंबा दिला आहे. भाजप मंत्रिमंडळात मित्र पक्षांना कसे स्थान देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर काही नेत्यांनी मंत्रिपदावरही पाणी सोडले आहे.
“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
या सोबतच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यात रिपाइंला मंत्रिपद देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. आठवलेंच्या पाठेपाठ आता राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनीही भाजपकडे मंत्रिपदाची मागणी केली आहे. भाजपने मित्रपक्षांना मंत्रिमंडळात वाटा दिला पाहिजे असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
“राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”
शिंदे फडणवीस सरकारमध्ये आम्हाला मंत्रिपद द्यायला हवं. मागच्या सरकारमध्ये आम्हाला महायुतीच्या माध्यमातूून मंत्रिपद मिळालं होतं. त्यामुळे नव्या सरकारमध्ये रिपाइंला संधी मिळायला हवी. रिपाइंला एक मंत्रिपद, महामंडळाचं अध्यक्ष आणि संचालकपद द्यावे. तसेच शासनाच्या विविध कमिट्यांवर रिपाइंच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Read also
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
- “हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
- महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
- “आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला