मुंबई : शिक्षण पात्रता योजना (TET) म्हणजे टीईटीमध्ये घोटाळा प्रकरणात परीक्षा परिषदेकडून गैरप्रकार प्रकरणात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर त्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमची बंदी घालण्यात आली आहे. या यादीत शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावांचा समावेश आहे. अब्दुल सत्तर यांच्या कन्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे या यादीत असल्याचे समोर आले आहे.
“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्ध झालेली यादी ही 2019 मधील आहे. माझ्या मुलींनी 2020 मध्ये परीक्षा दिली होती. त्यात त्या परीक्षेत माझ्या मुली अपात्र ठरल्या होत्या मग या यादीत त्यांचे नाव येण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्या चार वर्षात जर माझ्या संस्थेकडून या संदर्भात शिक्षण विभागाला एखादे जरी पत्र गेले असेल, तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा. हा माझ्या बदनामीचा कट आहे. या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर करवाई करावी, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
“राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”
टीईटी घोटाळा प्रकरणात जे विद्यार्थी दोषी आहेत अशा विद्यर्थ्यांची यादी परिक्षा विभागाकडून जारी करण्यात आली आहे. या यादीत तब्बल 7 हजार 874 विद्यार्थांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आले आहे. यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे.
“हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
यावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तार मंत्री असताना घोटाळा झाला आहे. त्यामुळे चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. आरोग्य सेवक भरती प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असताना टीईटी परीक्षेतील घोटाळा समोर आला आहे.
Read also
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
- “हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
- महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
- “आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला
- “एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”