सातारा : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सध्या महाराष्ट्रात तरूणांनामध्ये मोठी क्रेज आहे. ते विविध कारणांमुळे समाज माध्यमांवर चर्चेत असतात. अशातच ते कोल्हापुर सातारा येथील दौऱ्यावरचा त्यांचा एक फोटो चांगलाचं चर्चेत आला आहे. यावरून त्यांच्यावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
रोहित पवार सातारा दौऱ्यावर गेले असता त्यांनी य़शंवतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी भेट देत अभिवादन केलं. त्यावेळी त्याठिकाणी जोरदार पाऊस सुरू होतं. रोहित पवार यांच्या हातात छत्री होती. तरी देखील ते पावसात भिजत राहिले. त्यावरून त्यांना समाजमाध्यामांवर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. यावर सदाभाऊ खोत म्हणाले की, आजोबा भिजले नातूही भिजले पण काय उपयोग? ह्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यातील अडचणींचा, प्रश्नांचा पूर नाही दिसला. ह्या नाटकावर पडदा टाका रोहित दादा, प्रेक्षक हुशार आहेत.
महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
दरम्यान, रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी त्यांचे काही फोटो अपलोड करीत असं म्हटलं आहे की, देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते आणि हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजची भेटही प्रेरणादायी होती.
आजोबा भिजले नातूही भिजले पण काय उपयोग? ह्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यातील अडचणींचा, प्रश्नांचा पूर नाही दिसला.
ह्या नाटकावर पडदा टाका रोहित दादा, प्रेक्षक हुशार आहेत. pic.twitter.com/igMlgyXDEl
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) August 8, 2022
देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते आणि हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजची भेटही प्रेरणादायी होती. pic.twitter.com/u91zvgHByw
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
Read also
- मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?
- “अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
- मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”