मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन महिना झाला, तरी देखील राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसल्यामुळे विरोधी पक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. बरेच दिवस प्रलंबित राहिलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा अखेर मुहुर्त लागला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज महत्वाची बैठक पार पडली. याबैठकीनंतर मंत्रालयातील घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुख्यमंत्री शिंदेच्या नंदनवन या बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये आता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होईल अशी महिती समोर येत आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यातील हा दुसरा दौरा आहे.
“आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर, उद्य सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदिपान भुमरे, भरत गोगावले तसेच अपक्ष बच्चू कडू, राजेद्र पाटील येड्रावकर यांना संधी मिळणार असल्याचं बोलले जात आहे. तर भाजपमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव लोणीकर, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, अशिष शेलार, नितेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे.
“एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुुद्यावर आणि शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सुप्रिम कोर्टाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये असा समज होता, पण अधिवेशन तोंडावर असताना आणि राज्यातील पूरस्थितीसारखे प्रश्न गंभीर झाल्याने मंत्रिमंळाचा विस्तार आता होणार आहे. 10 ऑगस्टपासून अधिवेशन सुरू होत आहे. सुप्रिम कोर्टातील सुनावणी 12 ऑगस्टला पुढे ढकलण्यात आली आहे. त्यापुर्वी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.
Read also
- “अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
- मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
- “हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”