मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नवनियुक्त मंत्री आज मंत्रालयात उपस्थित राहिले असून आजच्या बैठकीत मंत्र्यांना खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांना अर्थखात देऊ नये यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेस सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये पहिली ठिणगी…! “अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नये, शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे ओरड “
राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थखातं, जलसंपदा, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग देऊ नये, यासाठी शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या गोंधळात शिंदेंचाच गेम होणार ? ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा बंडखोरांच्या विरोधात कोर्टात धाव
महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी होती. यातच आता शिंदेंच्या सरकारमध्ये देखील अजित पवार यांना अर्थमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवारांकडेच राज्य सरकारच्या तिजोरीच्या चाव्या असल्याने शिंदे गटातील मंत्र्यांची अस्वस्थता वाढली आहे. यातच अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर आमचं राजकीय करीअर धोक्यात येणार असल्याचं शिंदे गटातील आमदारांचं म्हणणं असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची संभाव्य यादी
अजित पवार – महसुल विभाग किंवा अर्थविभाग, सहकार विभाग
दिलीप वळसे पाटील- सांस्कतिक विभाग
छगन भुजबळ- ओबीसी आणि बहुजन विकास
हसन मुश्रीफ- अल्पसंख्याक आणि कामगार
धनंजय मुंडे- सामाजिक विभाग
अदिती तटकरे- महिला व बालकल्याण विभाग
धर्मराव अत्राम-आदिवासी विभाग
संजय बनसोडे-क्रिडा व युवक कल्याण
अनिल पाटील-अन्न व नागरी पुरवठा
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मॅरेथान बैठक, अजित पवार की शरद पवार, पाठिंबा कुणाला ?
हेही वाचा…‘या’ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता ‘अजित पवार’ यांच्या सोबत जाणार नाही
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंच्या उपस्थित सत्तेत जाण्याचं ठरलं होतं,पण..”, राष्ट्रवादीच्या आमदारांचा गौप्यस्फोट
हेही वाचा…अजित पवारांकडे ‘महसुल खातं’ तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना कोणती खाती ? खातेवाटपाची संभाव्य यादी जाहीर
हेही वाचा…राज्यातील बंडानंतर आता निवडणुकांचे वेध, ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुकांचा हंगाम सुरू