IMPIMP
Ajit Pawar's complaint to Chandrakant Patal; Big controversy in District Planning Committee Ajit Pawar's complaint to Chandrakant Patal; Big controversy in District Planning Committee

अजित पवारांची तक्रार चंद्रकांत पाटलांकडे; जिल्हा नियोजन समितीत मोठा वाद

पुणे : जिल्हा नियोजन समितीवरून भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी नाराजी दिसून आली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या कामांवर शिंदे गट आणि भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे गटातील दहा सदस्यांनी थेट जिल्ह्याध्यक्षांना निवेदन दिलं असून निधीवाटपावरून कोर्टात जाण्याचा इशारा शिंदे गटाने दिला आहे. यावरून राज्याची तिजोरी लुटण्यासाठी ३ पक्षांनी युती केल्याची टिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.

हेही वाचा…“८०० कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार “, महायुतीत ठिणगी, अजित पवारांवर भाजप व शिंदे गटाच्या सदस्यांचा

अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या १० सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक न घेता पत्रावर निधी दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. ७ महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीचं कामकाज ठप्प असल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे.१९ मे रोजी झालेल्या बैठकीचं इतिवृत्त द्या. जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. समितीचा विषय सदस्यांनी चंद्रकांत पाटलांकडे मांडला आहे.

हेही वाचा…“काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा”, 6200 किलोमीटर, १४ राज्य अन् २० मार्चला मुंबईत होणार समारोप 

दरम्यान, स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घ्या अशा सुचना चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ८०० कोटींची कामे रद्द करा नाही तर  कोर्टात जाणार असा इशारा जिल्हा समितीने दिला आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं चर्चेत आलंय.

READ ALSO :

हेही वाचा…“काकांच्या सवालीत वाढलेल्या अजित पवारांमध्ये बराच फरक”, अजित पवारांना आव्हाडांनी चांगलचं सुनावलं 

हेही वाचा…एकाने आमदारकीसाठी तर दुसऱ्याने खासदारकीसाठी पक्षाला ठोकला रामराम..! पवार अन् संजोग वाघेरेंमुळे ठाकरेंना मिळालं बळ 

हेही वाचा.“गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही”, जरांगे पाटलांचा सरकारला कडक इशारा 

हेही वाचा“भारत न्याय यात्रा तुम्हाला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न दाखवणार”, यशोमती ठाकूर यांचं विधान 

हेही वाचा..नागपुरात सुनील केदारांभोवती भाजचपचं चक्रव्युह ; आणखी एका प्रकरणात धक्का देण्याच्या तयारीत