पुणे : भारतीय कुस्ती महासंघावर क्रीडा मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारमधील क्रिडा मंत्रालयाने WFI वर मोठी कारवाई केली आहे. भारतीय महासंघाच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, ज्यामध्ये बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले. होते. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियांनी परत केलेला पद्मश्री याशिवाय महिला कुस्तीपटूंनी सुरू ठेवलेला संघर्षमुळे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. त्यानंतर क्रिडा मंत्रालयाने महासंघाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता विरोधकांनी जोरदार टिका केलीय.
हेही वाचा..ठरलं तर मग..! आघाडीत असं असणार लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला
महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैगिंक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर कुस्तीपट्टूंनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मोठं आंदोलन उभं केलं. यातच मोठ्या गोंधळात पार पडलेल्या भारतीय कृस्ती महासंघाच्या निवडणुकीत भृजभूषण सिंह यांचेच निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर कुस्तीपट्टू साक्षी मलिक यांनी निवृत्ती जाहीर केली तर बजरंग पुनियांनी पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाल्यानंतर महासंघच बसखास्त करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा…अमोल कोल्हेंची कुंडली अजितदादांनी वाचली..! शिरूरचा उमेदवार निवडूनच आणणार, अजितदादांचा इशारा
दरम्यान, या घटनेवरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टिका करत महिला कुस्तीपटूंचं कौतूक केलंय. महिला कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह याचा निकटवर्तीय नवीन अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कुस्ती महासंघही बरखास्त करण्यात आला. महिला कुस्तीपटू आणि संवेदनशील भारतीयांचा हा विजय आहे. सत्य परेशान हो सकता है पराजित नही… संघर्ष निरंतर, विजय अटळ!!!असं काॅंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकचा धोबीपछाड; भारतीय कुस्ती संघ बरखास्त! असा जोरदार टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला लगावला.
कुस्तीपटू साक्षी मलिक ची निवृत्ती आणि बजरंग पुनियांनी परत केलेला पद्मश्री याशिवाय महिला कुस्तीपटूंनी सुरू ठेवलेला संघर्ष. तमाम भारतीयांकडून महिला कुस्तीपटूंना मिळत असलेला पाठिंबा. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. महिला कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या माजी…
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा.कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
हेही वाचा…“तर लोकसभेच्या ४८ जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कुणाला किती जागा मिळणार? धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, परंतु केदारांची तातडीने रद्द झाली”, वडेट्टीवारांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचाअमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणारच, अजितदादांचं खुलं चॅलेंज, अमोल कोल्हेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…