नागपूर : नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा प्रकरणी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भात काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यातच बच्चू कडू यांना शिक्षा झाली परंतु त्यांची आमदारकी रद्द केली नाही. पंरतु भाजपने सुनील केदार यांच्याबाबत उलट केलं आहे. यातच नागपुरात भाजपने सुनील केदार यांचा बदला घेतला असल्याची जोरदार टिका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केलीय.
हेही वाचा…मुंबईत कशी धडक मारायची ? जरांगे पाटलांनी सांगितला अॅक्शन प्लॅन
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुधीर पारवे यांना शिक्षा झाली. त्यावेळेस त्यांची आमदारकी रद्द झाली नाही. तसेच बच्चू कडू यांच्याबाबतीत देखील तसंच झालं होतं. परंतु सुनील केदार यांच्याबाबत लगेच आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात सुनील केदार यांचं ग्रामिण भागात वर्चस्व होतं. सर्व निवडणुका त्यांनी एकतर्फी जिंकल्यात. भाजपच्या त्याठिकाणी दारूण पराभव झाला. काॅंग्रेसशिवाय भाजपला सुनील केदार यांनी उभं राहू दिलं नाही. त्याचा बदला भाजपने घेतला आहे. बदला घेऊन घाईघाईने आमदारकी रद्द केली. विरोधकांना संपवण्याचं काम त्यांचं आता दिसून येत आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटलांची मोठी घोषणा, २० जानेवारीला मराठा वादळ मुंबईत धडकणार “, शिवाजी पार्कवर आमरणचा दिला इशारा
दरम्यान, सुनील केदार यांची जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड राहिली आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषदांवर त्यांचा दबदबा राहिलाय. राज्यात काॅंग्रेस पिछाडीवर जात असताना केदार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता राखलीय. ग्रामीण भागांवर वचर्स्व असून दांडगा जनसंपर्क आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी विरोधकांना अनेकदा मात दिलीय. बाकी सगळ्या जागांवर कांग्रेस उमेदवारांचा पराभव झाला होता.
बच्चू कडू यांची आमदारकी रद्द झाली नाही,
सुधीर पारवे यांची आमदारकी रद्द झाली नाही.
मात्र सुनील केदार यांची आमदारकी तातडीने रद्द झाली.@SunilKedar1111 यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला उभे राहू दिले नाही. त्यामुळे त्यांना संपवण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न सुरू आहे. pic.twitter.com/r0hJA0HKtG— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 25, 2023
READ ALSO :
हेही वाचाअमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणारच, अजितदादांचं खुलं चॅलेंज, अमोल कोल्हेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा..ठरलं तर मग..! आघाडीत असं असणार लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला
हेही वाचा…अमोल कोल्हेंची कुंडली अजितदादांनी वाचली..! शिरूरचा उमेदवार निवडूनच आणणार, अजितदादांचा इशारा
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या स्मरणशक्तीत काहीतरी गडबड, छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही”, भुजबळांचा पलटवार
हेही वाचा…मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांची घोषणा ! एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..