मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामाना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यातच आता प्रत्येकजण आपापल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतांना दिसत आहेत. यातच आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यातच आता महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…ठाकरेंनी आदेश दिला तर लोकसभा लढवणार, अंबादास दानवेंनी खैरेंचं वाढवलं टेन्शन
महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये वंचित आणि स्वाभिमानी संघटना आघाडीत आल्यास ठाकरे गटाला २०, काॅंग्रेसला १६, तर शरद पवार गटाला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर वंचित आणि स्वाभिमानी संघटनेला प्रत्येकी एक एक जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालयातून मराठा समाजासाठी गुड न्यूज, कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन याचिका स्विकारली
दरम्यान, महाविकास आघाडीत वंचित आणि स्वाभिमानी संघटना न आल्यास, ठाकरे गटाला २३, काॅंग्रेसला १५ तर शरद पवार गटाला १० जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यातच आता जागा वाटपाची चर्चा दिल्लीत होणार असून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काॅंग्रेसचं हायकमांड यावर चर्चा करतील, अस संंजय राऊतांनी म्हटलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला २४ जागा मिळणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…अमोल कोल्हेंची कुंडली अजितदादांनी वाचली..! शिरूरचा उमेदवार निवडूनच आणणार, अजितदादांचा इशारा
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या स्मरणशक्तीत काहीतरी गडबड, छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही”, भुजबळांचा पलटवार
हेही वाचा…मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांची घोषणा ! एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…मुंबईत कशी धडक मारायची ? जरांगे पाटलांनी सांगितला अॅक्शन प्लॅन
हेही वाचा.“जरांगे पाटलांची मोठी घोषणा, २० जानेवारीला मराठा वादळ मुंबईत धडकणार “, शिवाजी पार्कवर आमरणचा दिला इशारा