छत्रपती संभाजीनगर : २०१९ च्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव अपक्ष उभे राहिले, मतांची फाटफुट झाली अन् एमआयएमचे उमेदवार इत्मियाज जलील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. यावेळी इत्मियाज जलील यांना वंचितची देखील मोठी साथ मिळाली. त्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे निवडणुकीनंतर बाजूला पडले. यातच आता शिवसेना पक्ष फुटीनंतर सेनेत दोन गट पडल्याने मोठा गोंधळ निर्माण झालाय. परंतु यावर आमचाच झेंडा फडकणार असं विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलंय.
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो,” अजित दादांच्या या वक्तव्याचा काॅंग्रेसने घेतला समाचार
सलग चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. परंतु पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा लढवणार असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कुणाला उमेदवारी देणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय. यातच आता शिंदे गटात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार असणार असा दावा शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. तर भाजपने देखील यावर आपला दावा सांगितला आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार? ‘या’ खासदाराचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
दरम्यान, लोकसभा निवडणुकीबाबत अंबादास दानवे म्हणाले की, मी उमेदवारी मागणार नाही. मात्र, पक्षाने आदेश दिला तर मैदानात उतरत लढणार आहे. असं म्हणत लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी अंबादास दानवे यांनी दर्शविली आहे. तसेच मराठवाड्यातील बहुतांश आमदार शिंदे सोबत गेले आहेत. परंतु शिवसेना पक्ष फुटीनंतर मराठवाड्यात याचा काहीही फटका बसणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालयातून मराठा समाजासाठी गुड न्यूज, कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन याचिका स्विकारली
हेही वाचा…“शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती पण.. त्यावेळी..” प्रफुल्ल पटेलांनी सांगितला तो किस्सा
हेही वाचा…“मिंधे सरकारचं गुन्हेगारांना वरदान,” ठाकरे गटाची शिंदेंवर जोरदार टिका
हेही वाचा..पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी का? छगन भुजबळांचा सवाल
हेही वाचा…शरद पवारांची साथ द्यायला नातू मैदानात, पवार कुटुंबीयातील आणखी एक व्यक्ती राजकारणात