पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर कार्याकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल सातत्याने शरद पवार यांच्या राजकीय भूमिकांवर भाष्य करतांना दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप देखील होतांना आपण पाहत आहोत. यातच आता सन १९९६ मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी हुकल्याचंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे यावर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हे शेतकऱ्यांसाठी मैदानात, ‘या’ मागण्यांसाठी चार दिवस आंदोलन करणार
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, सन १९९६ साली ११ महिन्यांत एच. डी देवेगौडा यांचं सरकार पडणार असल्याचं निश्चित झालं होतं. त्यावेळी, स्वत: पंतप्रधानांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं. मी राजीनामा देतो, त्यांना पंतप्रधानपद घ्यायला सांगा. असा निरोप तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांनी माझ्याकडे दिला होता. विशेष म्हणजे . हवं तर मी आत्ता तुझ्याकडे राजीनामा देऊ का? असेही ते म्हणाले. त्यावेळी. मी नम्रपणे आपण देशाचे पंतप्रधान आहात. माझ्याकडे राजीनामा देऊ नका. असे म्हटले होते.
हेही वाचा..सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
दरम्यान, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी अपात्र आमदारांवरील याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणावर येत्या जानेवारी महिन्यात सुनावणी घेणार आहेत. तर शिवसेना आमदार अपात्र याचिकेवरील निकाल येत्या १० जानेवारीला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या दोन्ही प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मिंधे सरकारचं गुन्हेगारांना वरदान,” ठाकरे गटाची शिंदेंवर जोरदार टिका
हेही वाचा..पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी का? छगन भुजबळांचा सवाल
हेही वाचा…शरद पवारांची साथ द्यायला नातू मैदानात, पवार कुटुंबीयातील आणखी एक व्यक्ती राजकारणात
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो,” अजित दादांच्या या वक्तव्याचा काॅंग्रेसने घेतला समाचार
हेही वाचा…अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार? ‘या’ खासदाराचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात एकच चर्चा