नवी दिल्ली : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समाजाला जात आहे. याबाबत माहिती देतांना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी क्युरेटिव्ह पीटीशनबाबत मोठं भाष्य केलं आहे. यातच पुढील सुनावणी २४ जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार? ‘या’ खासदाराचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
क्युरेटिव्ह पिटीशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटीशन सुनावणीसाठी ठेवली आहे. याचा अर्थ असा होतो की क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारले नसून, ते स्वीकारले आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल, असं विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हे शेतकऱ्यांसाठी मैदानात, ‘या’ मागण्यांसाठी चार दिवस आंदोलन करणार
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत याआधी कोर्टात सुनावणी पुर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती. दरम्यान, यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. यातच आता या प्रकरणावर कोर्ट लवकरात लवकर निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती पण.. त्यावेळी..” प्रफुल्ल पटेलांनी सांगितला तो किस्सा
हेही वाचा…“मिंधे सरकारचं गुन्हेगारांना वरदान,” ठाकरे गटाची शिंदेंवर जोरदार टिका
हेही वाचा..पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी का? छगन भुजबळांचा सवाल
हेही वाचा…शरद पवारांची साथ द्यायला नातू मैदानात, पवार कुटुंबीयातील आणखी एक व्यक्ती राजकारणात
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो,” अजित दादांच्या या वक्तव्याचा काॅंग्रेसने घेतला समाचार