मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापत चालला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटलांना दिलेली तारिख उद्या संपत आहे. त्याआधी बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा पार पडली. या सभेत त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपासून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. यातच त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील जोरदार टिका केली आहे. त्यावर आता छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती पण.. त्यावेळी..” प्रफुल्ल पटेलांनी सांगितला तो किस्सा
छगन भुजबळ म्हणाले की, क्युरेटिव्ह पिटीशन मुळे सर्वोच्च न्यायालयात चांगल्याप्रकारे चर्चा करता येईल. काही त्रुटी होत्या त्या दुर करण्यसाठी आता मोठी संधी आहे. मनोज जरांगे पाटलाचं अर्धे भाषण भुजबळांवरतीच होतं. बाकीचं लेकर बाळावरती होतं. त्यामुळे भुजबळांवर बोललं नाही तर करणार काय ? हा मुद्दा त्यांच्यासोबत येणार स्वाभाविक होता. मराठा आरक्षण सगेसोयरेंनाही द्या, असं सांगत होतं. परंतु हा मुद्दा त्यांनी आजच्या सभेत घेतलाच नाही.
हेही वाचा…“मिंधे सरकारचं गुन्हेगारांना वरदान,” ठाकरे गटाची शिंदेंवर जोरदार टिका
जरांगे पाटलांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडी तरी गडबड आहे. कारण एकाच भाषणात दुहेरी भाषा वापरत आहे. एका ठिकाणी ते बोलतात की हॉटेल, घरं भुजबळांच्या लोकांनी जाळलं. प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांचे घर ऑफिस, शिक्षण संस्था सर्वच भुजबळांनीच जाळलं. त्यातून मराठ्यांना तुम्हीच डाग लावला. त्यानंतर अधिकाऱ्यांनीच जाळलं. असं म्हणाले. त्यानंतर त्यांनी भुजबळांवर हल्ला केला. थोड्या वेळाने ते मराठ्यांच्या वाटेला जाऊ नका. नाही तर बीडला काय होतं ते लक्षात येईल. मग बीडची घटना तुम्हीच केली असल्याची कबुली आहे का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
हेही वाचा..पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी का? छगन भुजबळांचा सवाल
तुला बघतो तुला बघतो असं वारंवार सांगत आहे. छगन भुजबळ तुझ्या कोल्हेकुईला दाद देत नाही, अशा अन्यायाच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला आहे. दादागिरीच्या विरोधात त्याच्या जन्माच्या अगोदर पासून लढत आहे. जास्त घेतल्यामुळे विसरल्यासारखं होत असेल तर एकतर जास्त घेतल्यामुळे विसरल्यासारखं होत असेल, ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहतात नाहीत, तर बाहेर राहतात. 12 इंच छाती आहे, ठोकून ठोकून उगाच जास्तीचं काही होईल. कोणी आरे म्हटले तर कारे कोणीतरी करणार आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांची घोषणा ! एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…मुंबईत कशी धडक मारायची ? जरांगे पाटलांनी सांगितला अॅक्शन प्लॅन
हेही वाचा.“जरांगे पाटलांची मोठी घोषणा, २० जानेवारीला मराठा वादळ मुंबईत धडकणार “, शिवाजी पार्कवर आमरणचा दिला इशारा
हेही वाचा…ठाकरेंनी आदेश दिला तर लोकसभा लढवणार, अंबादास दानवेंनी खैरेंचं वाढवलं टेन्शन
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालयातून मराठा समाजासाठी गुड न्यूज, कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन याचिका स्विकारली