मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकात काही महिन्यावरच येऊन ठेपल्याने पक्षांनी जोरदार तयारी सुरू करून दिलीय. राज्यात पुढील निवडणुका या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा रंगण्याची शक्यता आहे. यातच पक्ष फुटीचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फायदा होणार का ? याकडे देखील लक्ष लागून राहिलं असताना सी-व्होटर आणि एबीपी न्यूजने केलेल्या सर्व्हेत धक्कादायक माहिती समोर आलीय.
हेही वाचा…मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांची घोषणा ! एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
आज समजा लोकसभेची निवडणुक झाल्यास पोलनुसार भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४० जागांपैकी भाजप आघाडीला फक्त १९ ते २१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काॅंग्रेस आघाडीला २६- २८ जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर इतरांच्या पारड्यात दोन जागा पडणार. यातच मतांच्या टक्केवारीनुसार, भाजप आघाडीला ३७ टक्के, काॅंग्रेस आघाडीला ४१ तर इतरांना २२ टक्के मते मिळतील. असंही सांगण्यात आलंय.
हेही वाचा…मुंबईत कशी धडक मारायची ? जरांगे पाटलांनी सांगितला अॅक्शन प्लॅन
दरम्यान, सी व्होटरच्या पोलनुसार महाराष्ट्रात भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. तर काॅंग्रेसला मोठा फायदा होणार आहे. यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, या सर्व्हेंचा काहीही उपयोग होत नाही. कारण आपण विधानसभांच्या निवडणुकीत याआधी पाहिलं आहे. सर्व्हेमध्ये तुम्ही फक्त दहा हजार ते पंधरा हजार लोकांचं मत विचारत घेतात. त्यातच अजून तो सर्व्हे कुठल्या भागात झाला आहे. त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या सर्व्हेमुळे काहीही फरक पडणार नाही. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, परंतु केदारांची तातडीने रद्द झाली”, वडेट्टीवारांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचाअमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणारच, अजितदादांचं खुलं चॅलेंज, अमोल कोल्हेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा..ठरलं तर मग..! आघाडीत असं असणार लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला
हेही वाचा…अमोल कोल्हेंची कुंडली अजितदादांनी वाचली..! शिरूरचा उमेदवार निवडूनच आणणार, अजितदादांचा इशारा
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या स्मरणशक्तीत काहीतरी गडबड, छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही”, भुजबळांचा पलटवार