मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांबाबतचे निवेदन राज्यपालांना सादर केले.
महाराष्ट्रातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार
यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, अनिल पाटील, नितीन पवार, चंद्रकांत नवघरे, सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते. निवेदनात विविध मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेले संकट लक्षात घेऊन विदर्भ, मराठवाडा व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी रु. 75 हजार मदत द्यावी, तसेच फळ पिकांसाठी हेक्टरी रु.1 लाख 50 हजार तात्काळ मदत करावी.
इडी, सत्ताधीशवाले तुम्हाला एकतर तुरूंगात, नाहीतर मारून टाकतील; यशोमती ठाकुरांचा गंभीर आरोप
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरता सरसकट शैक्षणिक शुल्क माफ करावे. विदर्भ व मराठवाड्यामध्ये शेतमजुरांची संख्या मोठी असून मागील 15 ते 20 दिवसांपासून शेतमजुरांवर मजुरीअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शेतमजुरांना सुद्धा एकरकमी मदत करण्याबाबतची सकारात्मक भूमिका सरकारने घ्यावी. अशी मागणी देखील त्यांनी केली.
एकटेच मुख्यमंत्री सर्व खात्यांना न्याय कसा देणार? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
दरम्यान, आदिवासी क्षेत्रामध्ये मुख्यत्वे भाताची लागवड असते. आदिवासी बांधवांना या कालावधीत उपजिवीकेचे साधन नसल्याने महाविकास आघाडीच्या शासनाने खावटीचे अनुदान दिले होते. त्याच धर्तीवर यावर्षीही खावटीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे.
Read also
- 50 बंडखोर आमदारांसाठी भाजपने अडीच हजार कोटी आणले कुठून? राष्ट्रवादीचा सवाल
- शिंदे-फडणवीस सरकारकडून ST महामंडळाला 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर
- पिंपरी- चिंचवड प्राधिकरण अन् ‘पीएमआरडीए’चा संबंधच काय? आमदार महेश लांडगे
- “संजय राऊत आता दोन चार वर्ष बाहेर येणार नाही, याची खात्री”; संजय शिरसाठ
- “हे देखील पण दिवस लवकरच जातील”; प्रणिती शिंदें