पुणे – भाजपशी असलेली 25 वर्षाची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनं सत्तास्थापना केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, भाजप नेत्यांच्या मनातील शल्य अद्यापही कमी झालेलं नाही. कारण, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पुण्यातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल’, असा घणाघात शाह यांनी केलाय. ते आज पुण्यातील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
आमच्या टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो; क्रिकेटच्या मैदानावर जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी
शिवसेनेवर टीका करताना शाह म्हणाले की, ‘2019 मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही’, अशी जोरदार टीका शाह यांनी शिवसेनेवर केली.
‘ते म्हणतात मी खोटं बोलत आहे. ठिक आहे. मी खोटं बोलतोय असं मानू. पण तुमच्या सभेच्या पाठी जे बॅनर लागत होते त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमची केवळ एक चतुर्थांश होती. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होतं. तुमच्या उपस्थित मी आणि मोदींनी सांगितलं होतं फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आहेत आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसले’, असा घणाघातही शाह यांनी केला
Read also:
- “ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील”; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दाखवला आरसा
- ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
- आम्ही आगामी नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडवणार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भीष्मप्रतिज्ञा
- “बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले”; मनिषा कायंदेंकडून गुलाबराव पाटलांची पाठराखण
- “जर माझ्या मतदारसंघाततील हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”