मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून त्यांची सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. तसेच, त्यांच्यावर सीबीआय पाठोपाठ आता ईडीकडूनही चौकशीची टांगती तलवार आहे. यातच आता काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने देशमुखांना दणका दिल्यांनतर आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील देशमुखांच्या अडचणीत वाढ केली आहे.
CBIचा अहवाल फोडल्याने अनिल देशमुखांच्या जावलयाला अटक; गौरव चतुर्वेदीची वीस मिनिटे चौकशी
ईडीच्या कारवाईविरोधात देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितीला होती. मात्र, उच्च न्यायालयाने मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे, सोबतच दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्याचे निर्देश त्यांना न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे यांनी दिले आहेत. त्यामुळे, आता हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठासमोर जाण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही
दुसरीकडे, अनिल देशमुख अजूनही ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले नाहीत. आत्तापर्यंत त्यांना ईडीकडून पाच वेळा समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, यातल्या एकाही समन्सला त्यांनी दाद दिली नसून, ईडीने आत्तापर्यंत देशमुखांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सगळ्या मालमत्तांवर छापेमारी केली आहे. त्यामुळे, त्यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात असल्याचे या सगळ्यातून दिसून येत आहे.
जयंत पाटलांनी फिल्डिंग लावली, सांगलीत होणार भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’
दरम्यान, काल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील डागा यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. दोघांनाही सीबीआयकडून कोणत्याही प्रकारचं समन्स सुनावण्यात आलं नव्हतं. आपल्या गाडीने जात असताना सीबीआयने गाडी रोखून ही कारवाई केली. २० मिनिटांच्या चौकशीनंतर जावयाची सुटका करण्यात आली आहे. मात्र, वकील डागा यांना देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाला होता. त्यासंदर्भात अटक केली आहे.
Read Also :
- खडसेंच्या सह आणखी ३ जणांची नावे चर्चेत, कुणाचा पत्ता कट होणार? मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
- उद्धव ठाकरेंचा झटका: मंत्रालयातील ३०० ‘पॉवरफुल्ल’ एकाचवेळी अधिकाऱ्यांच्या फेरबदल्या
- 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून ढवळाढवळ; राजू शेट्टी यांचा केला “करेक्ट कार्यक्रम”
- आगामी निवडणुकीत युती की महाविकास आघाडी? शरद पवारांनी आढावा बैठकीत केले चित्र स्पष्ट
- “…आता तसं कुणी म्हटलं कि दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,” चंद्रकांत पाटलांचं युतीबद्दल मोठं भाष्य