मुंबई : कुठल्याही कायद्यामध्ये स्पीकर लावणे किंवा उतरवणे हे सरकारचे काम नाही. ती सरकारची जबाबदारी नाही. ज्यांना स्पीकर अथवा भोंगे लावायचे आहेत. त्यांनी स्थानिक प्रशासकिय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचाच धागा पकडत आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांना सवाल केला आहे.
गुणरत्ने सदावर्तेंवर आता सोलापुरात गुन्हा दाखल! अकोला पोलीसही ताबा घेण्याच्या तयारीत?
बाळासाहेब नांदगावकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटिव्ही लावले आहेत. परंतु मशिदीत सीसीटिव्ही आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावली करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
गुणरत्ने सदावर्तेंना अखेर जामीन मंजूर! सातारा जिल्हा न्यायालय सुनावणीत
कोणत्याही मंदिरात स्पीकर लावण्यासाठी कोणावर सक्ती करण्यात आली नाही, अन् त्याबाबत कुणालाही सुचना देण्यात आल्या नाहीत. मंदिरात स्वच्छेने किंवा सुरक्षितेच्या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमेरे लावले असतील किंवा कुठल्याही धार्मिक स्थळांमध्ये सीसीटिव्ही लावायचे असतील तर त्याला विरोध करण्याचं काहीही कारण नाही. ज्याने त्याने हा स्वच्छेने निर्णय घ्यावा. त्यावर सरकारचं काही म्हणणं नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना ‘अर्थवटराव’ म्हटल्यानंतर मनसेकडून मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, तात्या विंचू…;
दरम्यान, येत्या 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेचा धसका राज्य सरकारने देखील घेतला असून त्यांसंदर्भात विरोधी पक्षांसह राज ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यावर काय निर्णय होईल. ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “राजू शेट्टींना काही अडचण होती तर त्यांनी..”; राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवणार! भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांचं वक्तव्य
- “धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला..;”मनसे आमदार राजू पाटलांचा मुंडेंना टोला
- “ऑम्लिपिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेना गोल्ड मेडल आणेल”
- मुंडेंकडून ‘अर्धवटराव’ तर मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाजसाहेब’ उल्लेख; राजकारण तापलं