मुंबई : ऑम्लिपिकमध्ये अनेक क्रिडाप्रकारात कोणी गोल्ड मेडल, रौप्य पदक तर कोणी कांस्य पदक जिंकत. ऑम्लिपिक मध्ये भारत देश अमेरिका, रशिया, चीन, जपान या देशापेक्षा मागे राहिला आहे. परंतु महाराष्ट्रात जर ऑम्लिपिक मध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेनेची मुंबई महापालिका गोल्ड मेडल आणल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका भाजप नेते सुधीर मुंनगटीवार यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपने सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
संजय राऊतांना ‘ते’ व्यक्तव्य भोवण्याची शक्यता! न्यायालयात अवमान याचिका दाखल
यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टिका केली आहे. ते म्हणाले की, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरच्या इमारतीतील एक फाईल अशी शोधून दाखवा की, त्यामध्ये पैसा खाल्ला नाही. बकासुर भी मुंबई कॉर्पोरेशन के नतेओंको देखकर कहेगा की रिश्ते मै तो तुम हमारे बाप लगते हो. अंग्रेज चले गए पर कुछ लोगों को छोडं गए असं वाटावं अशी मुंबईची अवस्था झाली आहे. असंही यावेळी ते म्हणालेत.
“राज ठाकरेंसोबत भाजप गेल्यास त्यांना महागात पडेल”; रामदास आठवलेंनी दिला इशारा
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरूद्ध काल कांदिवली येथे भाजपच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. यावेळी मुंबईचे भाजप नेते अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलीय”; संजय राऊतांचं राणेंंना प्रत्युत्तर
दरम्यान, आगामी काही काळात महापालिकेची निवडणुक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेच्या विरोधात भ्रष्टाचारांविरोधात पोलखोल सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच काल भाजपच्या पोलखोल मिरवणुकीत दगडफेक देखील करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलाचं तापण्याची शक्यात आहे.
Read also:
- मुंडेंकडून ‘अर्धवटराव’ तर मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाजसाहेब’ उल्लेख; राजकारण तापलं
- गुणरत्ने सदावर्तेंवर आता सोलापुरात गुन्हा दाखल! अकोला पोलीसही ताबा घेण्याच्या तयारीत?
- गुणरत्ने सदावर्तेंना अखेर जामीन मंजूर! सातारा जिल्हा न्यायालय सुनावणीत
- राज ठाकरेंना ‘अर्थवटराव’ म्हटल्यानंतर मनसेकडून मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, तात्या विंचू…;
- गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता! मुंबई पोलिसांचा शोध सुरू