सांगली : राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे सध्या राज्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. इस्लामापूर येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करीत त्यांच्यावर यावेळी त्यांनी मिमिक्री देखील केली. त्यामुळे अमोल मिटकरी यांचं भाषण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
“राज ठाकरेंसोबत भाजप गेल्यास त्यांना महागात पडेल”; रामदास आठवलेंनी दिला इशारा
हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वत:ला तरी हनुमान चालीसा येते का? असा देखील प्रश्न अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना केला आहे. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाईमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय डोकं आणि त्यात मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलीय”; संजय राऊतांचं राणेंंना प्रत्युत्तर
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या इस्लामपूर येथिल राष्ट्रवादी परिवार संवाद सभेमध्ये आवाहन केल्यावर खुले नाट्यगृहातील हजारो लोकांनी मोबाईलचे लाईट लाऊन अनोखी तेजस्वी सामूहिक ज्योत प्रज्वलित केली, इस्लामपुर येथून निर्माण झालेला विचार दिल्लिश्र्वराला एक दिवस झुकायला भाग पाडेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“राज ठाकरेंचं सोयी अन् सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व”; मनिषा कांयदे यांचा राज ठाकरेंना टोला
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यावेळी राज ठाकरे यांना अर्धवटरावांची उपमा दिली आहे. पुर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुलींचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सूरू आहे. अर्थवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्थवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे, आणि आता एकदा सीडी घुसली त्यामुळे अर्थवटराव शांत झाले. अशी मिश्किल शब्दात धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर मनसेकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
Read also:
- गुणरत्ने सदावर्तेंवर आता सोलापुरात गुन्हा दाखल! अकोला पोलीसही ताबा घेण्याच्या तयारीत?
- गुणरत्ने सदावर्तेंना अखेर जामीन मंजूर! सातारा जिल्हा न्यायालय सुनावणीत
- राज ठाकरेंना ‘अर्थवटराव’ म्हटल्यानंतर मनसेकडून मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, तात्या विंचू…;
- गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता! मुंबई पोलिसांचा शोध सुरू
- संजय राऊतांना ‘ते’ व्यक्तव्य भोवण्याची शक्यता! न्यायालयात अवमान याचिका दाखल