सांगली : अलिकडेच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमधून स्वाभिमानी संघटना बाहेर पडत असल्याची घोषणा केली. स्वाभिमानी संघटनेचे एकमेवर आमदार देवेंद्र भुयार यांनी देखील स्वाभिमानी संघटनेला रामराम टोकला. त्याआधी त्यांनी पक्षातून हाकालपट्टी करत असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं. राजू शेट्टी यांनी आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
गुणरत्ने सदावर्तेंना अखेर जामीन मंजूर! सातारा जिल्हा न्यायालय सुनावणीत
राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे कोणतेही कारण नव्हतं. त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? हे मला समजत नाहीत. तसेच त्यांना काही अडचण आली होती. तर मला किंवा आघाडीतील मंत्र्यांना सांगायला हवं होतं. त्यांनी बाहेर पडल्याची घोषणा केली तरी त्यांनी महाविकास आघाडीत राहावं, असं व्यक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
राज ठाकरेंना ‘अर्थवटराव’ म्हटल्यानंतर मनसेकडून मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, तात्या विंचू…;
देशात, एव्हाना राज्यात भाजप ही शेतकऱ्यांना चिरडत आहे. आज पाहिलं तर देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले आहेत. शेतकरी ट्रक्टर चालवतो, म्हणून त्यांनी इंधनाचे दर वाढवले आहेत. त्यांनी नेहमी शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत राहून शेतकऱ्यांच्या विरोधात प्रश्न उपस्थित करून काम केलं पाहिजे. अंसही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता! मुंबई पोलिसांचा शोध सुरू
दरम्यान, मागील काहि दिवसात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका करत आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार आघाडी सरकारचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच मागील एकही शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाला देवेंद्र भुयार यांनी हजेरी लावली नव्हती. तसेच त्यांनी नेहमी संघटनेविरोधात भूमिका घेतली असल्याचं म्हणत भुयार यांना राजू शेट्टी यांनी हाकललं होतं.
Read also:
- राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवणार! भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांचं वक्तव्य
- “धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला..;”मनसे आमदार राजू पाटलांचा मुंडेंना टोला
- “ऑम्लिपिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेना गोल्ड मेडल आणेल”
- मुंडेंकडून ‘अर्धवटराव’ तर मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाजसाहेब’ उल्लेख; राजकारण तापलं
- गुणरत्ने सदावर्तेंवर आता सोलापुरात गुन्हा दाखल! अकोला पोलीसही ताबा घेण्याच्या तयारीत?