मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यावेळी राज ठाकरे यांना अर्धवटरावांची उपमा दिली आहे. पुर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुलींचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सूरू आहे. अर्थवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्थवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे, आणि आता एकदा सीडी घुसली त्यामुळे अर्थवटराव शांत झाले. अशी मिश्किल शब्दात धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर मनसेकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता! मुंबई पोलिसांचा शोध सुरू
धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना ? तुमच्या बुडाखाली काय जळतंय व टोचतंय याची कल्पना आहे आम्हाला. त्यामुळे तुमच्या वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते, असा टोला मनसे आमदार राजू पाटलांनी हाणला आहे.
संजय राऊतांना ‘ते’ व्यक्तव्य भोवण्याची शक्यता! न्यायालयात अवमान याचिका दाखल
तसेच हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वत:ला तरी हनुमान चालीसा येते का? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना केला आहे. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाईमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय डोकं आणि त्यात मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“राज ठाकरेंसोबत भाजप गेल्यास त्यांना महागात पडेल”; रामदास आठवलेंनी दिला इशारा
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर महासभेत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जोरदार प्रहार केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून मनसेवर जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून संवाद सभेचं आयोजन केलं जात आहे. काल इस्मालापूर सभेत राष्ट्रवादी काॅंग्रसकडून टिका करण्यात आली आहे.
Read also:
- “ऑम्लिपिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेना गोल्ड मेडल आणेल”
- मुंडेंकडून ‘अर्धवटराव’ तर मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाजसाहेब’ उल्लेख; राजकारण तापलं
- गुणरत्ने सदावर्तेंवर आता सोलापुरात गुन्हा दाखल! अकोला पोलीसही ताबा घेण्याच्या तयारीत?
- गुणरत्ने सदावर्तेंना अखेर जामीन मंजूर! सातारा जिल्हा न्यायालय सुनावणीत
- राज ठाकरेंना ‘अर्थवटराव’ म्हटल्यानंतर मनसेकडून मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, तात्या विंचू…;