पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी सात जागांची मतमोजणी पार पडली. या सात जागांसाठी १४ उमेदवार नशीब अजमावत होते. अखेर राष्ट्रवादीने बँकेच्या जवळपास सर्व पॅनलवर बाजी मारली. त्यानंतर आज बँकेच्या अध्यक्षपदासाठी घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यात पार पडलेल्या बैठकीनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे यांची निवड करण्यात आली आहे.
जवळपास एक तास संचालकांशी अजित पवारांनी चर्चा केली आहे. अजित पवार बँक संचालक यांच्यातील जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाबाबतची बैठक संपली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर सर्व संचालक निवडणुकीसाठी जिल्हा बँकेकडे रवाना झाले होते. एक तास चाललेल्या बैठकीत अजित पवार यांनी इच्छुकांची मतं जाणू घेतली असल्याचं कळतंय.
पुणे जिल्हा बँकेवरील संख्याबळ
राष्ट्रवादी – 17
काँग्रेस – 02
भाजप – 02
एका बाजूला रमेशआप्पा थोरात यांच्यासारखेअजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शिलेदार असले तरी दुसऱ्या बाजूला बॅंकेच्या निवडणुकीत तब्बल ८५ टक्के मताधिक्याने विजयी झालेले अशोक पवार (Ashok Pawar) हे ही अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. याशिवाय आमदार दिलीप मोहिते आणि वेल्ह्यातून रेवणनाथ दारवटकर यांनाही अध्यक्षपद देण्याची मागणी होत होती. अखेर नव्या नावांची घोषणा झाली आहे.
पार्थ पवारांनी घेतली अजित पवार यांची भेट; पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये तब्बल दोन तास खलबतं
प्रा. दुर्गाडे हे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि मावळत्या संचालक मंडळातही संचालक होते. सुमारे एका दशकाच्या खंडानंतर दुर्गाडे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळाले आहे. ते यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ड वर्ग मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत.
Read also:
- राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
- …तर प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलारांच मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर
- पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; कडक निर्बंध लागणार? आज होणार निर्णय
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? अजितदादा म्हणतात… मी आणि वळसे पाटील…
- सिंधुदुर्गमध्ये फक्त नारायण राणेंचीच हवा; जिल्हा बँकेतील ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो हटवले