मुंबई : अशोक चव्हाण यांना कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासह अनेक महत्वाची पदे दिलीत. त्यांनी कॉंग्रेस सोडण्याचं कोणतंही कारण सांगितलं नाही. असे पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्विकारणार नाही. इडीचा सीबीआयचा अशोक चव्हाण यांच्यावर दवाब होता का ? कॉंग्रेसमध्ये काही अडचण होती का ? नसेल तर मग त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं. असं म्हणत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेस मधून कोणीही जाणार नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा…मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच मिळणार, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
अशोक चव्हाण यांच्यानंतर कॉंग्रेसला भलं मोठं भगदाट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधीच कॉंग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. तर या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्यासह भाजपवर जोरदार टिका केली. भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळ्याबाबत बोलले आणि मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतं. असं म्हणत भाजप वॉशिंग मशीन आहे का ? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा कॉंग्रेसला राम राम..,! काय आहे आदर्श घोटाळा ? वाचा सविस्तर
दरम्यान, तसेच अशोक चव्हाण नेते होते. त्यांना नेतृत्व करायचे होते. त्यांच्या सगळ्या सूचना ऐकल्या जागा वाटपची जबाबदारी दिली. अजून काय करायला हवे होते ? मैदान सोडून पळून गेले, इतकं डरपोक असू नये. अशीही टिका त्यांनी केली. अशोक चव्हाण सोडून कॉंग्रेसचा एकही नेता कार्यकर्ता जाणार नाही. नांदेडचे नगरसेवक आम्हाला भेटायला आले. त्यांना सुद्धा चव्हाण यांनी सांगितलं नाही की पक्ष प्रवेश करतोय. उद्धव ठाकरे अन् शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून काम करतोय. महाराष्ट्रत आघाडी मजबूतीने पुढे जात आहे. त्यांच्या राजीनाम्याने कोणताही फरक पडणार नाही. असेही त्यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने महायुतीत खळबळ, महायुतीच्या मित्र पक्षानेच भाजपला कडक इशारा
हेही वाचा…“कॉंग्रेस तसा मोठा सागर, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही”
हेही वाचा…“भाजपाची स्मरणशक्ती कमजोर, का ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ? नाना पटोलेंचा भाजपला सवाल
अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? फडणवीसांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…