मुंबई : राज्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेचे आमदार राजूरकर यांनी देखील भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला आणखी मोठं बळ मिळालं असून यावेळी अशोक चव्हाण यांचा उल्लेख राष्ट्रीय नेता म्हणून करत फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा…राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणुक, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांना प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही करून अशोक चव्हाण यांना पक्षात रितसर प्रवेश दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांचा राष्ट्रीय नेता म्हणून उल्लेख करत मोठे संकेत दिले आहेत. यावेळी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारले असता. त्यावर म्हणाले की, अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे. त्याचा आम्ही फायदा घेऊयात. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा…ठरलं तर मग..! अशोक चव्हाणांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार, कॉंग्रेस खिंडार पडण्यास सुरूवात
दरम्यान, आम्ही विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. विकासाची आम्ही नेहमी साथ दिली असून ३८ वर्ष कॉंग्रेसमध्ये राहून नवीन सुरूवात करत आहे. राज्यासाठी काम करतांना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. गेल्या ३८ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय. अशी पहिली प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक आम्हाला साथ धिली आहे. मी प्रमाणिकपणे भाजपमध्ये काम करेने. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी आम्ही काम करू. मी यावेळी कुणावरही व्यक्तिगत टिका करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास करत आहेत. मी कधीही कुणावर व्यक्तीगत टिका केली नाही आणि करणार पण नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच मिळणार, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा कॉंग्रेसला राम राम..,! काय आहे आदर्श घोटाळा ? वाचा सविस्तर
हेही वाचा…बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! शरद पवार गटाचा चव्हाणांना टोला
भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी ? भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत, रंगत वाढली
हेही वाचा…एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शहांच्या ग्रीन सिग्नची प्रतिक्षा, एकच चर्चा