मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. अशोक चव्हाणा यांनी घेतलेल्या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसेच कॉंग्रेसच्याही नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टिका केली आहे. तर शरद पवार गटाने देखील यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.
हेही वाचा…“श्रेय वादाची लढाई नाही!”धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून कॉंग्रेस अन् भाजपमध्ये जुंपली
अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर ते आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करीत आहेत. याबाबत त्यांनीच माहिती दिली आहे. तर या पक्ष प्रवेशावर शरद पवार गटाने खोचक टिप्पणी केली आहे. शरद पवार गटाने याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, Johnyy Johnnu yes papa ? Eatingh Khoke ? No papa ! Leaving Party ? No papa ! Afraid of ED ? No papa ! Telling Lies ? No papa ! Open your mouth !!! भा..ज.. पा.. तसेच बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! असे म्हणत शरद पवार गटाने चव्हाणांना टोला लगावला आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा राजीनामा..! परंतु कॉंग्रेसने ‘या’ निवडणुकीत भाजपला पाणी पाजलं, एकच चर्चा
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत आज भाजपच्या मुंबई येथील कार्यालयात माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी ही महत्वाची घडामोड घडली असून महाराष्ट्रात यामुळे कॉंग्रेसला मोठे खिंडार पडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या २८ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमधली देखील राजकीय गणितं बदलली आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता भाजप आपला सहावा उमेदवार देखील देण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.
बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! pic.twitter.com/TAHYuF1MQS
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 13, 2024
READ ALSO :
भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी ? भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत, रंगत वाढली
हेही वाचा…एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शहांच्या ग्रीन सिग्नची प्रतिक्षा, एकच चर्चा
हेही वाचा…राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणुक, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण
हेही वाचा…ठरलं तर मग..! अशोक चव्हाणांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार, कॉंग्रेस खिंडार पडण्यास सुरूवात
हेही वाचा…“माझी शेवटची शोभा यात्राही कॉंग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल”, कॉंग्रेसच्या या नेत्याने घेतला प्रण