मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने विरोधी पक्षातील बडे नेते फोडण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपने आपल्या प्रत्येक मतदारसंघात वेगळी रणनिती आखली असून बाहेरील पक्षातील नेत्यांचे भाजपमध्ये घेऊन त्यांचे पुनर्वसन केले जात असल्याचे दिसून येत आहे. यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असणारे निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत भाष्य केले आहे.
हेही वाचा…“भाजपाला आता कुत्रासुद्धा मत देणार नाही , कारण..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
गेल्या अनेक दिवसापासून राज्यात विरोधी पक्षातील अनेक बडे नेते महायुतीत प्रवेश करतांना दिसत आहे. याचाच भाग म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे देखील भाजपमध्ये येण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करत असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवला नसल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा…“आगे आगे देखो होता है क्या..” फडणवीसांच्या विधानानंतर भाजप नेत्यांची धाकधुक वाढली, कुणाचं तिकीट, तर कोणाची खरकटी…?
गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. परंतु अद्याप पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत विचारणा झालेली नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. मला वाटतं की तसं काही प्रयोजन नाही, मला अजूनही कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी एक छोटा कार्यकर्ता असून कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरून हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, असे महाजन यांनी सांगितले आहे.
तर गिरीश महाजन यांनी केलेला दावा एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावला आहे. तसेच मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यावर खडसे म्हणाले की, गेले काही दिवसापासून मी भाजपमध्ये प्रवेश करणार अशा अफवा माझ्याबाबत संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे असे खडसेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणुक, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण
हेही वाचा…ठरलं तर मग..! अशोक चव्हाणांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार, कॉंग्रेस खिंडार पडण्यास सुरूवात
हेही वाचा…“माझी शेवटची शोभा यात्राही कॉंग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल”, कॉंग्रेसच्या या नेत्याने घेतला प्रण
“श्रेय वादाची लढाई नाही!”धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून कॉंग्रेस अन् भाजपमध्ये जुंपली
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा राजीनामा..! परंतु कॉंग्रेसने ‘या’ निवडणुकीत भाजपला पाणी पाजलं, एकच चर्चा