मुंबई : गेल्या काही काळापासून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. परंतु आज सकाळी या चर्चांना बळ मिळालं असून अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. येत्या दोन दिवसात अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावरून विचारले असता आगे आगे देखो होता है क्या अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यावर आता शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपला डिवचलं आहे.
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
आज मुंबईतील भाजपच्या कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसला कडक इशारा दिला. कॉंग्रेसमधील अनेक चांगले नेते हे भाजपच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे कॉंग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहेत. त्यातून जनतेशी जोडले नेत्यांची घुसमट होत आहे. त्यातून देशभरातून कॉंग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यावर फडणवीसांच्या या स्टेटमेंट नंतर काँग्रेस ऐवजी भाजपच्याच नेत्यांमध्ये जास्त धाकधूक वाढली आहे. कोणाचं तिकीट कटणार ? कोणाची खरकटी काढावी लागणार ? असा सवाल करत प्रशांत जगताप यांनी भाजपला डिवचलं आहे.
हेही वाचा… अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ खंदे समर्थकांना दिला राजीनामा, चर्चांना उधाण, कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ
दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्य आणि कॉंग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक नेते, पदाधिकारी तसेच आमदार सोबत असल्याची माहिती समोर येत आहे. तर कॉंग्रेसचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते मैदानात उतरले आहेत. यातच आता राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, तसेच अद्यापही मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्यचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर कॉंग्रेसचा देखील राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसमध्ये असतांना प्रमाणिकपणे काम केलं आहे. त्यामुळे मला कुणावरही टिका करायची नाही. यापुढची राजकीय दिशा येत्या दोन ते तीन दिवसात घेणार आहे. भाजपमधून राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी मिळणार म्हणून भाजपमध्ये जाणार आहे का ? यावर ते म्हणाले की मला भाजपची कार्यप्रणाली अद्यापही माहिती नाही. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे दोन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
फडणवीसांच्या या स्टेटमेंट नंतर काँग्रेस ऐवजी भाजपच्याच नेत्यांमध्ये जास्त धाकधूक वाढली आहे.
कोणाचं तिकीट कटणार ?
कोणाची खरकटी काढावी लागणार ? pic.twitter.com/ViWbSw7wax— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसमधून राजीनामा का दिला ? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले….
अशोक चव्हाणांचा कॉंग्रेस पक्षाला राम राम, नाना पटोलेंनी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा…राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…“महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस पक्षाचा हिरो, मला कशाचीच भीती नाय,” कॉंग्रेसच्या ‘या’ आमदारांचं मोठं विधान
हेही वाचा…कॉंग्रेसचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन दिग्गज मैदानात, राज्यात हालचालींना वेग, अशोक चव्हाणांचा राजीनामा