मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुरूवातीला आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिल्याने कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा भाजप प्रवेश होणार असून यामध्ये नांदेड, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांपुर्वी कॉंग्रेसला मोठे खिंडार पाडण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…“राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय”, पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चव्हाणांचे खंदे समर्थक माजी विधानसभा सदस्य अमर राजूरकर यांनी हा राजीनाम दिला आहे. अमर राजूरकर यांनी देखील कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्षात त्यांच्याकडे पक्ष उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. नांदेड जिल्हा कमिटीचे सदस्य देखील ते राहिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोण कोण राजीनामा देणार ? त्याकडे लक्षा लागून राहिलं आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी भाजपची वाचली कुंडली, शरद पवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये चांदिवलीचे माजी आमदार नसीम खान, चचेंबुरचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे, उमरेडचे आमदार राजू पारवे, पश्चिम नागपुरचे आमदार विकास ठाकरे, नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे, चंद्रपुर, राजूराचे सुभाष धोटे, रिसोड वाशिमचे अमित झनक हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच विश्वजीत कदम, जितेश अंतापूरकर, विधान परिषदेचे आमदार अमर राजुरकर हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, कॉंग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. कॉंग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत. भाजपमध्ये कोण कोण येणार आहे. याबाबत मी इतकंच सांगेन की आगे आगे देखो, होता है क्या अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काँग्रेसला मोठे खिंडार? अशोक चव्हाणांसोबत जाण्यास कॉंग्रेसची मोठी फौज तयार, पाहा यादी
हेही वाचा..अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल ? चव्हाणांचा प्रमुख विरोधक खासदार प्रतापराव चिखलीकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आमदारकीचा दिला राजीनामा ? राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचामहाराजांची जिरेटोप योगी आदित्यनाथांच्या डोक्यावर, शरद पवार गटाचा भाजपवर थयथयाट
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”