मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. सुरूवातीला माजी मंत्री उल्हास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मुंबईतील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर याताच आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची मोठी माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे याचा कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार आहेत.
हेही वाचा…“तर महाराष्ट्र असाच आणखी खाली सरकत राहील”, विरोधकांनी राज्य सरकारला दिला कडक इशारा
गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यातच आज अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळ्याची तयारी सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा….महिन्याआधी भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची दावेदार, केतकी पाटलांचा रावेरमध्ये कार्यक्रमांचा धडका
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसमध्ये राहून विविध पदांची जबाबदारी पार पडली आहे. यातच कॉंग्रेसकडून अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री पदी देखील राहिले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हा कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचामहाराजांची जिरेटोप योगी आदित्यनाथांच्या डोक्यावर, शरद पवार गटाचा भाजपवर थयथयाट
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
हेही वाचा…“राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय”, पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा..शरद पवारांनी भाजपची वाचली कुंडली, शरद पवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…बारामतीत पवार कुटुंबात संघर्ष पेटला, भावी खासदार म्हणून लागलेल्या ‘सुनेत्रा पवारां’च्या बॅनरवर शाईफेक